शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रॉकेलचा कोटा ९६ हजार लिटरने घटला

By admin | Updated: April 29, 2015 15:51 IST

औरंगाबाद : केंद्र सरकारने औरंगाबाद जिल्ह्याच्या केरोसिनच्या कोट्यात पुन्हा एकदा कपात केली आहे. यावेळी दर महिन्याचा हा कोटा ९६ ...

औरंगाबाद : केंद्र सरकारने औरंगाबाद जिल्ह्याच्या केरोसिनच्या कोट्यात पुन्हा एकदा कपात केली आहे. यावेळी दर महिन्याचा हा कोटा ९६ हजार लिटरने कमी झाला आहे. परिणामी जिल्ह्याला यापुढे महिन्याकाठी १७ लाख ४ हजार लिटर इतकेच रॉकेल मिळणार आहे. सामान्य नागरिकांना स्वयंपाक आणि दिवाबत्तीसाठी केंद्र सरकारकडून सवलतीच्या दरात रॉकेलचा पुरवठा केला जातो. मात्र, स्वयंपाकासाठी गॅसचा वापर वाढत असल्यामुळे सरकारकडून सातत्याने रॉकेलचा कोटा कमी केला जात आहे. गेल्या साडेचार वर्षांत आतापर्यंत सहाव्यांदा हा कोटा कमी करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्याला दर महिन्याला १९ लाख ९२ हजार लिटर रॉकेल मिळत होते. मात्र डिसेंबर महिन्यात हा कोटा ३९ टक्क्यांनी कमी करून तो १२ लाख ३६ हजार लिटर करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोटा कमी करण्यात आल्यामुळे त्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलने झाली. त्याची दखल घेत सरकारने हा कोटा पुन्हा काहीसा वाढवून तो १८ लाख लिटर केला. परंतु आता एप्रिलपासून यात पुन्हा कपात करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार यापुढे जिल्ह्याला १७ लाख ४ हजार लिटर इतकेच रॉकेल मिळणार आहे. रॉकेलचा कोटा कमी झाल्यामुळे विशेषत: ग्रामीण नागरिकांची गैरसोय होणार आहे. साडेचार वर्षांत ७५ टक्के कपातसाडेचार वर्षांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यास महिन्याला ६८ लाख लिटर रॉकेल मिळत होते. आतापर्यंत सहा वेळा यात कपात केली गेली. आता हा कोटा ६८ लाख लिटरवरून १७ लाख ४ हजार लिटरवर आला आहे. जिल्ह्यात एकूण ७ लाख २१ हजार शिधापत्रिकाधारक आहेत. यातील ग्रामीण भागातील बहुतेक कुटुंबे स्वयंपाकासाठी तसेच दिवाबत्तीसाठी आजही रॉकेलचाच वापर करतात. साडेचार वर्षांपूर्वी शिधापत्रिकाधारकांना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमागे दोन लिटरप्रमाणे रॉकेल मिळत होते. आता कोटा सातत्याने कमी कमी झाल्यामुळे एका कुटुंबामागे प्रत्येकी दोन लिटर इतकेच रॉकेल मिळत आहे.