शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कळमनुरी तालुक्यात निराधारांची सूक्ष्म तपासणी मोहीम रखडली, ६ गावाचे ११६८ अहवाल अप्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 17:04 IST

कळमनुरी तालुक्यात  निराधार लाभार्थ्यांची सूक्ष्म तपासणी मागील एप्रिल महिन्यापासून तलाठ्यामार्फत करण्यात येत आहे. अजूनही सहा गावच्या तलाठ्यांनी १ हजार १६८ निराधार लाभार्थ्यांचा सूक्ष्म तपासणी अहवाल तहसील कार्यालयात सादर केला नाही.

हिंगोली : कळमनुरी तालुक्यात  निराधार लाभार्थ्यांची सूक्ष्म तपासणी मागील एप्रिल महिन्यापासून तलाठ्यामार्फत करण्यात येत आहे. अजूनही सहा गावच्या तलाठ्यांनी १ हजार १६८ निराधार लाभार्थ्यांचा सूक्ष्म तपासणी अहवाल तहसील कार्यालयात सादर केला नाही.

कळमनुरी तालुक्यात एकूण ९ हजार २७१ निराधार लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांची सूक्ष्म तपासणी तलाठ्यामार्फत करण्यात येत आहे. या तपासणीत लाभार्थी मयत आहे का? मुले नोकरीला आहेत का? यासह स्थलांतरीत लाभार्थी, लाभार्थ्यांचा आर्थिक स्तर आदींची सूक्ष्म तपासणी तलाठ्यांमार्फत घरोघरी जावून केली जात आहे. सूक्ष्म तपासणी अहवालावर मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच यांच्या स्वाक्षरीनिशी सदरचा अहवाल हा तहसील कार्यालयात सादर केला. परंतु, तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील ५०, कळमनुरी- ९४८, नांदापूर-५१, हरवाडी-०६, सिंदगी-९८, जांब-६१५ अशा एकूण १ हजार १६८ निराधार लाभार्थ्यांचा सूक्ष्म तपासणी अहवाल अद्यापपर्यंत तहसील कार्यालयात सादर करण्यात आला नाही. सदरील अहवाल सादर करण्याबाबत तलाठ्यांना यापूर्वी ५ वेळा नोटिसा बजावण्यात         आल्या. परंतु, अद्यापपर्यंत १ हजार १६८ लाभार्थ्यांचा सूक्ष्म तपासणी अहवाल हा सादर करण्यात आला नाही. 

दरम्यान, ज्या गावांतील तलाठ्यांनी सदरचा सूक्ष्म तपासणी अहवाल सादर केला नाही, त्या गावांतील तलाठ्यांना आता अहवाल सादर करण्यासंदर्भात पुन्हा एकदा स्मरणपत्र दिले जाणार आहे. त्यानंतरही तलाठ्यांनी सदरचा तपासणी अहवाल सादर केला नाही, तर संबंधित तलाठ्यांविरूद्ध कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, २० टक्के लाभार्थ्यांची आधार लिकिंग नाही. संजय गांधी, इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृद्धपकाळ श्रावण बाळ या योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांचे आधार लिकिंगचेही काम सुरू आहे. सदरील काम हे मागील ८ ते १० महिन्यापासून सुरू करण्यात आले असून सद्यस्थितीत २० टक्के लाभार्थ्यांनीही आधार क्रमांक तहसील कार्यालयात जमा केला नाही. त्यामुळे सदर लाभार्थ्यांच्या आधार लिकिंगचे काम रखडले असून १ जानेवारीपासून निराधार लाभार्थ्यांचे मानधन थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

.... नसता तलाठ्यांविरूद्ध होणार कारवाईज्या गावांतील तलाठ्यांनी सदरचा सूक्ष्म तपासणी अहवाल सादर केला नाही, त्या गावांतील तलाठ्यांना आता अहवाल सादर करण्यासंदर्भात पुन्हा एकदा स्मरणपत्र दिले जाणार आहे. त्यानंतरही तलाठ्यांनी सदरचा तपासणी अहवाल सादर केला नाही, तर संबंधित तलाठ्यांविरूद्ध कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत संबंधित तलाठ्यांना सदर लाभार्थ्यांचे अहवाल देणे आवश्यक आहे. अहवालानंतरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा केले जाणार आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोली