शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

जयभीमच्या घोषणांनी दणाणली हिंगोली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:33 IST

येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध सामाजिक कार्यक्रमांसह सायंकाळी मिरवणुकाही काढण्यात आल्या. यात आबालवृद्ध हर्षोल्हासात सहभागी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध सामाजिक कार्यक्रमांसह सायंकाळी मिरवणुकाही काढण्यात आल्या. यात आबालवृद्ध हर्षोल्हासात सहभागी झाले होते.हिंगोलीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध भागात सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालयांत अभिवादनाचा कार्यक्रम झाला. अनेक बुद्धविहारात अनेक सामाजिक उपक्रमही ठेवले होते. यात त्या-त्या भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डॉ.आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने मोटारसायकल रॅलीही काढली. आ.तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, नगरसेवक गणेश बांगर, दिवाकर माने, प्रा.साकळे, मिलींद उबाळे आदींच्या उपस्थितीत ही रॅली निघाली. यात तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सायंकाळी चार वाजेच्या नंतर शहरातील विविध भागांतून डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे मिरवणुका येत होत्या. यामध्ये ढोल-ताशांच्या गजरात लेझीम पथके, सजीव देखावे सादर करण्यात आले. निळे झेंडे हाती घेऊन सहभागी झालेल्या तरुणांमुळे सगळे रस्ते या रंगात न्हाऊ न निघाल्यासारखे भासत होते. ठिकठिकाणी या मिरवणुकांसाठी पाण्याची व्यवस्था केल्याचेही पहायला मिळाले. काही ठिकाणी फराळही होता. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरूच होत्या.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी अनिल भंडारी आणि पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पुष्पहार अर्पण करत मानवंदना दिली. यावेळी पोलीस बँड पथकाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. ८ ते १५ एप्रिल कालावधीत आयोजित सामाजिक समता सप्ताहाची सांगता झाली. यावेळी जि.प.च्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, सभापती सुनंदा नाईक, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, समाजकल्याण अधिकारी छाया कुलाल, तहसीलदार गजानन शिंदे, वन अधिकारी केशव वाबळे, न.प. मुख्याधिकारी रामदास पाटील, सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, समाज कल्याण अधिकारी गीता गुट्टे, डीवायएसपी सुजाता पाटील, पोनि मारुती थोरात, डॉ. विजय निलावार, मधुकर मांजरमकर यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Hingoliहिंगोली