शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जावयाने केला सासऱ्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:51 IST

वसमत (हिंगाेली) : मुलगी व जावयाच्या भेटीला आलेल्या अपंग सासऱ्याला जावयानेच डोक्यात लाकडी दांड्याने मारून ठार मारल्याची घटना सोमवारी ...

वसमत (हिंगाेली) : मुलगी व जावयाच्या भेटीला आलेल्या अपंग सासऱ्याला जावयानेच डोक्यात लाकडी दांड्याने मारून ठार मारल्याची घटना सोमवारी घडली. वसमत येथील लिटल इंग्लिश स्कूलच्या इमारतमधील वॉचमनच्या खोलीत ही घटना घडली आहे.

वसमत येथील लिटल इंग्लिश स्कूलमधील वॉचमन असलेल्या काशीनाथ साहेबराव चौरे यांच्याकडे त्यांचा सासरा पंडितराव विठ्ठल पानधोंडे (वय ६५, रा. पळसगाव) भेटीसाठी आले होते. सासरा-जावयामध्ये काहीतरी वाद झाला. प्रकरण हातघाईवर आले. यात जावयाने सासऱ्याच्या डोक्यात दंडुक्याने मारून त्यांचा जीव घेतला. या घटनेने खळबळ उडाली. घटनेतील मयत पंडितराव पानधोंडे हे अपंग होते. या घटनेचे वृत्त शहर पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, सपोनि श्रीदेवी पाटील, सपोनि पंढरीनाथ बोधनपोड, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश आवडे, गजानन बरगे व पोलीस घटनास्थळी धावले.

आरोपी जावई काशीनाथ चौरे यास पाेलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी लिटल इंग्लिश स्कूलचे संचालक नामदेव दळवी यांनी वसमत पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून काशीनाथ चौरे विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शाळेत वाॅचमन असलेला जावई व सासरा यांच्यात नेहमी वादावादी हाेत असे. वादावादी कोणत्या कारणावरून व्हायची, याचे कारण समजले तर खुनामागचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकते. खून प्रकरणात एकटा जावईच आहे की अन्य कुणाचा सहभाग आहे, हे पोलीस तपासात स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि श्रीदेवी पाटील करीत आहेत.