शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

हिंगोलीत इज्तेमाई शादीयाँ मेळावा थाटात; २० जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 11:09 IST

येथे जमियते-उलमा हिंदच्या पुढाकारातून ४ फेब्रुवारी रोजी रविवारी इज्तेमाई शादीया मोठ्या थाटात पार पडल्या असून यामध्ये २० लग्न संपन्न झाले आहे. सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने परिसरातील ग्रामस्थ व मुस्लीम बांधवांची उपस्थिती होती.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : येथे जमियते-उलमा हिंदच्या पुढाकारातून ४ फेब्रुवारी रोजी रविवारी इज्तेमाई शादीया मोठ्या थाटात पार पडल्या असून यामध्ये २० लग्न संपन्न झाले आहे. सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने परिसरातील ग्रामस्थ व मुस्लीम बांधवांची उपस्थिती होती.कुरूंदा येथे इज्तेमाई शादीया सलग दुसºया वर्षापासून घेतले जात आहे. या सोहळ्याकरीता गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी केली जात होती. विविध चोख व्यवस्थासह हा सोहळा आयोजित करण्यात आला. २० लग्न या इज्तेमाई शादीयामध्ये मोठ्या थाटात पार पडले आहेत. ४ फेब्रुवारी रोजी मदीना नगर मध्ये हा एकात्मतेचा सोहळा पार पडला. मुस्लीम बांधवांसह इतर समाज बांधवांनी वधु-वरांना स्वच्छेने विविध भेट देवून एकात्मतेचा दर्शन दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमात एकात्मतेचा सदभावना कुरूंद्यात पहावयास मिळते. त्याचे दर्शन इज्तेमाई शादीयामध्ये देखील पहावयास मिळाले. उत्साहात इज्तेमाई शादीयॉचा कार्यक्रम हजारो लोकांच्या व सर्वधर्माच्या लोकांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला आहे.सोहळ्याकरीता खा. अ‍ॅड. राजीव सातव, माजी खा. शिवाजी माने, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, निरंजन पाटील इंगोले, राकाँ जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, माजी नगराध्यक्ष अब्दुल हाफीज, सभापती राजेश पाटील इंगोले, भाजपा तालुकाध्यक्ष खोब्राजी नरवाडे, बाबुराव दळवी, दत्तराव इंगोले, मुंजाजीराव इंगोले, सुभाषराव भोपाळे, रियाज कुरेशी, पं.स. सभापती चंद्रकांत दळवी, अशोकराव दळवी, सपोनि शंकर वाघमोडे, बबनराव कदम, विश्वनाथराव दळवी, माजी शिक्षण सभापती रंगराव कदम आदींची उपस्थिती होती.जमियते-उलमा हिन्दचे मराठवाडा अध्यक्ष मुफ्ती मिर्झा कलीम बेग, मौलाना हाफीज ऊला कासमी, मौलाना ईतीयास कासमी, मौलाना ईसाखान कासमी, हाफीज आब्दुल रशीद, मौलाना मो. एकबाल, मौलाना अजमुता खा, मौलाना ऐजाज बेती, मौलाना निजामोद्दीन काजी, हाफीज, आब्दुल हाकीम, हाफीज साल्लार, हाफीज आब्दुल खालीक आदींची उपस्थित होते. होती.या सोहळ्यामध्ये माजी नगराध्यक्ष अ. हाफीज, शेख फारुख हवालदार, शेख असद, खाजाभाई, कृउबा समिती सभापती राजेश पाटील इंगोले, वधुसाठी व्यापारी राजेश गवळी, सुभाषराव भोपाळे, सय्यद अहेमद मलंग, बुरखा- शेख आसद परभणी, हिंगोली एटीएम बिरादारीच्या वतीने, हिंगोली जमियते-उलमा, जिंतूर- जालना जमियते-उलमा, इंगोले, शेख फेरोज जहागीरदार, शेख शौकत, शेख सिराज आदींनी विविध वस्तू भेट म्हणून दिल्या. सोहळ्याकरीता परिसरातील ग्रामस्थ व मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये जेवन, पाणी, शरबत, चहा आदी व्यवस्था होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इस्माईल हाफीज पाशा, मुफ्ती कलीम मौलाना, हाफीज आहेमद, हाफीज शफीख, मौलाना आब्दुल रहेमान, शेख फारुख, शेख असद, शेख रियाज, शेख अहेमद, इरफान कुरेशी, निसार आत्तार, रफीक मनियार, हाजी वहिद, हाजी शेनुर, उमर जहागिरदार, जावेद मनियार, फेरोज जहागीरदार, नजीब कुरेशी करीम बागवान, सलीम कुरेशी, शौकत भाई, खाजाभाई, ताहेर अलीसाब, मसूदभाई जहागीरदार, मुखीद हावलदार यांच्यासह मुस्लीम बांधवांनी व युवकांनी परिश्रम घेतले.जमियते उलमा हिंदचे कार्य १९१९ पासून सुरू असून एकात्मता व भाईचारा हे कार्य जमियते उलमा काम करीत आहे. विविध कार्यक्रमातून हे कार्य करीत असून लोकांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न कार्य करून आवाजावा खर्च न करता व हंडा न घेता लग्न करणे आजच्या काळाची गरज असल्याचे मत जमियते- उलमाचे मराठवाडा अध्यक्ष मुफ्ती मिर्झा बेग यांनी व्यक्त केले. प्रत्येकांनी प्रत्येक धर्माची आदर केल्यास सद्भावना वाढेल व एकात्मता कायम राहील, भारताला पुढे जाण्यासाठी एकात्मतेची अत्यंत गरज असून तेच कार्य जमियते उलमा हिंद करीत आहे. इंग्रजाच्या विरोधात देखील जमियते उलमाने लढा दिला होता. स्वातंत्र्याच्या लढाईत उलमांचा मोठा सहभाग होता, असे मौलाना हाफीज उला कासमी यांनी सांगितले.