शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन रेशन कार्ड वाटपात अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST

सेनगाव : येथील तहसील कार्यालयात मागील वर्षभरापासून नवीन रेशन कार्ड मिळत नसल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहेत. अनेकांना रेशन कार्ड ...

सेनगाव : येथील तहसील कार्यालयात मागील वर्षभरापासून नवीन रेशन कार्ड मिळत नसल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहेत. अनेकांना रेशन कार्ड नसल्याने शासनाच्या आरोग्य सुविधेसह अन्य योजनेचा लाभ घेताना अडचण निर्माण हाेत आहे. यामुळे नवीन रेशन कार्ड वाटपातील अनियमितता दिसून येत आहे.

सेनगाव तालुक्यात रेशन कार्ड वाटपातील अनियमितता अनेक वर्षांपासून कायम आहे. आज स्थितीला तहसीलच्या पुरवठा विभागात नवीन रेशन कार्ड पहायला मिळत नसताना, बाहेरून आलेल्या नवीन रेशन कार्डला नोंदणीकृंत करण्याचे सोपे काम करून लाभार्थ्यांची वेळ मारून नेली जात आहे. पूर्वी येथील तहसील कार्यालयाला प्राप्त नवीन रेशन कार्डचे वाटप नियमांनुसार, गरजवंत किवा गहाळ झालेल्या लाभार्थ्यांना नवीन कार्ड वाटप केले नाही. त्यामुळे आज स्थितीला या विना रेशन कार्डधारक कुटुंबासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. रेशन कार्ड गहाळ झालेले किवा विभक्त कुटुंब झालेले अनेक लाभार्थी नवीन कार्ड बनविण्यासाठी रितसर तहसील कार्यालयात मागणी अर्ज देऊन नियमांनुसार शुल्क भरणा करायला तयार असतानाही वर्षापासून तहसील पुरवठा विभागात नकाराशिवाय त्यांना काही मिळत नाही. अनेक गोरगरीब कुटुंबातील सदस्यांना केवळ रेशन कार्ड नसल्याने शासनाच्या मोफत आरोग्य उपचार सुविधेचा लाभ मिळत नाही. असे असताना तहसील कार्यालय, पुरवठा विभाग याबद्दल बेफिकीर आहे.

मागील वर्षभरापासून नवीन रेशन कार्ड नाही. पुरवठा विभागाने पंडीत दीनदयाळ योजनेच्या माध्यमातून नवीन ४ हजार ५०० रेशन कार्डची मागणी गतवर्षी माहे जानेवारीमध्ये केली असल्याचे जुनेच रडगाणे सांगितले जात आहे. परंतु वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. तालुक्यात नवीन रेशन कार्डची मागणी आता तीव्र झाली आहे. पूर्वी आलेल्या नवीन रेशन कार्डचे तहसील, रास्त भाव दुकानदार यांनी व्यवस्थितरित्या वाटप केले नाही. त्याचे वाटप कधी आणि कुणाला केले गेेेलेे याचा शोध आजपर्यंत लागला नाही. यापूर्वी तहसीलला प्राप्त नवीन रेशन कार्ड कुणाला वाटप झाले. किती रास्त भाव दुकानदारांनी लाभार्थ्यांपर्यत पोहचविले याची सविस्तर तपासणी करण्याची गरज आहे. नवीन रेशन कार्डबद्दल निर्णय घेऊन मागणी करणाऱ्यांना विनाअडथळा रेशन कार्ड वाटप करण्याची आता गरज आहे.

आमच्याकडे रेशन कार्ड नाहीत : पुरवठा विभाग

येथील पुरवठा विभागातील अव्वल कारकून कारघुडे यांनी नवीन रेशन कार्ड वर्षभरापासून नसल्याचे सांगितले. आम्ही साडेचार हजार नवीन रेशन कार्ड मागणी केली आहे. आमच्याकडे आता एकही नवीन रेशन कार्ड नसल्याने आम्ही नवीन कार्ड मागणी असूनही मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.