शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लाच प्रकरणात तत्कालीन गटविकास अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:52 IST

------------------------------------------------- कळमनुरी : तालुक्यातील ग्रामपंचायत भाटेगावच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण योजनेंतर्गत ३२ लाभार्थ्यांचे वैयक्तिक शौचालयाचे बांधकामाचे धनादेश देण्यासाठी ...

-------------------------------------------------

कळमनुरी : तालुक्यातील ग्रामपंचायत भाटेगावच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण योजनेंतर्गत ३२ लाभार्थ्यांचे वैयक्तिक शौचालयाचे बांधकामाचे धनादेश देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यासाठी पाच हजार रुपये तर स्वतःसाठी दोन हजार रुपयांची मागणी करणाऱ्या सहायक लेखाधिकाऱ्यांना सात हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने १५ जुलै २०२० रोजी रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी सखोल तपास केल्यानंतर यात गट विकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांचाही लाच घेण्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सहा महिन्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना २७ जानेवारी रोजी अटक केली.

तालुक्यातील भाटेगाव ग्रामपंचायत अंतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या योजनेंतर्गत ३२ लाभार्थ्यांचे वैयक्तिक शौचालयाचे बांधकामाचे अग्रिमचे ३ लाख ८४ हजार रुपयांच्या धनादेशावर तत्कालीन गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांची स्वाक्षरी घेऊन धनादेश देण्यासाठी त्याच्यासाठी आठ हजार रुपये तर स्वतःसाठी एक हजार असे नऊ हजार रुपयांच्या लाचेची मागणी पंचायत समितीतील सहायक लेखाधिकारी दत्तात्रय शिंदे यांनी केली होती. त्यानंतर स्वतःसाठी २ हजार व गटविकास अधिकारी यांच्यासाठी पाच हजार रुपये देण्याचे ठरले; परंतु ही लाच देण्याच्या मन:स्थितीत लाभार्थी नव्हते. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून १५जुलै २०२० रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर सहायक लेखाधिकारी दत्तात्रय शिंदे यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. यानंतर त्यांच्याविरुद्ध ७, ७ (अ) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या लाच प्रकरणात गटविकास अधिकारी यांचा समावेश आहे का? यासाठी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सखोल तपास केल्यानंतर त्यांनी गटविकास अधिकारी यांचा लाच मागणीत समावेश असल्याचे निष्पन्न झाले. नंतर २७ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या पथकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस उपाधीक्षक नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक ममता अफुने, पोहेकॉं विजय उपरे, महारुद्र कबाडे, विनोद देशमुख, तानाजी मुंढे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, प्रमोद थोरात यांच्या पथकाने कामगिरी केली. तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात येत आहे. दरम्यान, तत्कालीन गटविकास अधिकारी मनोहर खिलारी यांच्यावर कारवाई झाल्याने कळमनुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.