शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दोषी अभियंत्यावर कारवाईचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:31 IST

जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाश्वत पाण्याची उपलब्धता आणि शेतीकरीता शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरु आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील प्रत्येक गावात शाश्वत पाण्याची उपलब्धता आणि शेतीकरीता शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरु आहेत.हिंगोली तालुक्यातील सावा आणि चोरजवळा या गावात जलयुक्त अंतर्गत जलसंधारण विभागातंर्गत तीन आणि जिल्हा परिषदेच्या एक अशा एकूण चार सिमेंट नाला बांधकामांच्या गुणवत्तेची आज जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. जलसंधारण विभाग आणि जिल्हा परिषदेमार्फत तयार करण्यात आलेल्या सिमेंट नाला बांधकामांची सार्वजनीक बांधकाम विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता एम. आर. ठाकरे यांनी रिबाउन्ड हॅमरद्वारे तपासणी केली असता, सदर कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच नाला बांधमध्ये पिचिंग आणि खोलीकरणांचे काम व्यवस्थित झालेले नाही. सदर कामे करणाऱ्या कंत्राटदारास काळ्या यादीत टाकून त्यांचे देयक अदा करु नये, किंवा देयक अदा केले असल्यास वसूल करुन घ्यावेत. शासनाच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या योजनांची कामे चांगल्या दजार्ची करुन न घेता शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याने संबंधीत अभियंत्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी भंडारी यांनी यावेळी दिले. तसेच चोरजवळा येथील शेतकºयांनी नालाबांधामध्ये बोअरवेल घेतल्याने सदर बोअरवेल जप्तीचे आदेशही जिल्हाधिकारी भंडारी यांनी दिले आहेत.यावेळी जि. प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता घुबडे, जि. प. लघुसिचंनचे कार्यकारी अभियंता येडगे, सा.बां. वि. सहायक कार्यकारी अभियंता एम. आर. ठाकरे, अधीक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे, नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, सहायक नियोजन अधिकारी द. रा. आव्हाड, जलसंधारणचे खिराडे उपस्थित होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद