कोरोनामुळे गेल्यावर्षी मार्चपासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. तरीही राज्यातील शाळांमध्ये एक वर्षापासून ऑनलाईन शिक्षण घेण्यात येत होते. यासाठी शिक्षक व पालकांनी मोठे योगदान दिले. मधल्या काळात ५ वीपासून पुढील वर्ग भरविण्यात आले होते. ऑनलाईन परीक्षेची तयारी केलेली असताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १ ली ते ८ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय चुकीचा असून चुकीचा पायंडा पडण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ज्यां विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अथवा ऑनलाईन कोणतेच शिक्षण घेतलेले नाही,
अशा विद्यार्थ्यांना कोणतीही फिस न आकारता पुन्हा त्याच वर्गात बसविण्याचा तसेच अशा विद्यार्थ्यांना उत्तीर्ण न करण्याचा निर्णय घेतल्याचेही बांगर यांनी स्पष्ट केले. वर्षभर गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांना पास न करण्याचा व स्वेच्छेने अभ्यासक्रम रिपीट करण्यास तयार असणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही बांगर यांनी केली.