शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू वाहतूक; तीन टिप्पर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:24 IST

येथील तहसील कार्यालयाचा गौणखनिज पथकाने १० एप्रिल ला अवैध गौणखनिज वाहतूकी विरोधात धडक कारवाई करीत वेगवेगळ्या ठिकाणाहून वाळु ची वाहतूक करणारे तिन टिप्पर पकडले असून दंडात्मक कारवाई केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव: येथील तहसील कार्यालयाचा गौणखनिज पथकाने १० एप्रिल ला अवैध गौणखनिज वाहतूकी विरोधात धडक कारवाई करीत वेगवेगळ्या ठिकाणाहून वाळु ची वाहतूक करणारे तिन टिप्पर पकडले असून दंडात्मक कारवाई केली आहे.सेनगाव तहसील कार्यालयाचा गौण खनिज पथकाने मगळवारी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई करीत अवैध वाळू वाहतूक करणारी तिन वाहने पकडले.पथकाने एम.एच.३८ डी.९१७७,एम.एच. २६ ए.डी. ४९७९ असे दोन टिप्पर साखरा -कापडसिनगी रोडवर पकडले.तर आजेगाव परिसरात एक टिप्पर पकडले.पकडलेल्या वाहना पैकी दोन वाहने सेनगाव तहसील कार्यालयात तर एक वाहन गोरेगाव पोलीस ठाण्यात लावण्यात आले. या तिन्ही टिप्परवर तहसीलदार पाटील यांनी ९ लाख ५२८० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. वाहने पकडणाऱ्या या पथकात नायब तहसीलदार अशोक भोजणे, अव्वल कारकून बालाजी रेड्डी, लिपिक लक्ष्मण गायवाळ, तलाठी महेश सावरगाकर, राजकुमार शेळके, तलाठी बोडखे, खंदारे आदींचा समावेश होता.नवीन नियमानुसार दंडआता वाळूची वाहतूक करणाºया वाहनांना नव्या नियमानुसार दंड आकारणी केली जात आहे. त्यामुळे तीन लाखांचा दंड प्रतिवाहनास लागला आहे. यामुळे वाळूमाफियांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काहींना तर वाहनाच्या किमतीच्या अर्ध्या रकमेचा दंडच लागल्याचे सांगितले जात असून तस्करीला चाप बसणार आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीPolice Stationपोलीस ठाणे