शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्याने रागाच्याभरात पत्नीला पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:30 IST

कुरुंदा (जि. हिंगोली) : लग्न झाल्यापासून विविध कारणांनी पत्नीसोबत वाद घालून रागाच्याभरात चक्क पत्नीला पेटवून खून केल्याची घटना हिंगोली ...

कुरुंदा (जि. हिंगोली) : लग्न झाल्यापासून विविध कारणांनी पत्नीसोबत वाद घालून रागाच्याभरात चक्क पत्नीला पेटवून खून केल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातील पांगारा शिंदे येथे घडली. मयताला दोन महिन्यांची चिमुकली मुलगी असून, ही घटना २१ जानेवारी रोजी घडली. या प्रकरणातील आरोपीला कुरुंदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पांगारा शिंदे येथील मयत संगीता रामा मारकळ यांचा विवाह तीन वर्षाआधी झाला होता. लग्नानंतर काही चांगला संसार चालल्यानंतर ‘तू दिसायला चांगली नाहीस, तुला स्वयंपाक येत नाही,’ असे म्हणून सतत मारहाण करीत त्रास नवरा देत होता. विविध कारणाने सतत नवरा बायकोमध्ये वाद व्हायचे. त्यामुळे रागाच्या भरात ‘मी तुझा काटाच काढतो’ असे म्हणून २१ जानेवारी रोजी मयताच्या पतीने कोणत्या तरी निमित्ताने पांगारा शिंदे गावाबाहेरील बोल्डा नाल्यात घेऊन गेला. मयत संगीता मारकळ यास मारहाण करून अंगावर काहीतरी टाकून पेटवून दिले. जळून तिचा जाग्यावरच मृत्यू झाल्याची घटना घडली.

नवरा-बायकोच्या भांडणातून पतीने पत्नीस पेटवून खून केल्याचा प्रकार घडला असून, याप्रकरणी २२ जानेवारी रोजी कुरूंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताला दोन मुली असून, एक मुलगी दोन महिन्यांची चिमुकली आहे. दूध पिणाऱ्या त्या चिमुकलीची मायेची सावली बापामुळे हरवली आहे. मोलमजुरी करून उपजीविका चालविल्या जाते. या घटनेमुळे पांगारा शिंदे येथे हळहळ व्यक्त होत आहे.

फिर्यादी नानाराव भुरके यांच्या फिर्यादीवरून आरोपी रामा मारकळ याच्याविरुद्ध कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घटनास्थळी सपोनि सुनील गोपीनवार, फोजदार सविता बोधणकर, पो. नायक गजानन भोपे यांनी भेट दिली.