शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही शाळांत अचानक विद्यार्थी वाढले कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:12 IST

दहावीच्या परीक्षेच्या दोन दिवस आधी अचानक वाढीव विद्यार्थी आल्याने सेनगावात दिलेल्या केंद्रांवरही काही काळ गोंधळाचे चित्र होते. तर व्यवस्थेसाठी शिक्षण विभागात चांगलाच गोंधळ झाल्याने या विद्यार्थ्यांच्या प्रवेशातही बोगसगिरी झाल्याचा संशय या दोन्ही शाळांना शिक्षणाधिकाºयांनी दिलेल्या भेटीनंतर निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : दहावीच्या परीक्षेच्या दोन दिवस आधी अचानक वाढीव विद्यार्थी आल्याने सेनगावात दिलेल्या केंद्रांवरही काही काळ गोंधळाचे चित्र होते. तर व्यवस्थेसाठी शिक्षण विभागात चांगलाच गोंधळ झाल्याने या विद्यार्थ्यांच्या प्रवेशातही बोगसगिरी झाल्याचा संशय या दोन्ही शाळांना शिक्षणाधिकाºयांनी दिलेल्या भेटीनंतर निर्माण झाला आहे.तालुक्यातील कापडसिनगी येथील संत रेखेबाबा माध्यमिक विद्यालय व गजानन माध्यमिक विद्यालय येथे कोणत्याही भौतिक सुविधा नाहीत. मात्र येथे दहावीत तब्बल सातशे विद्यार्थी प्रवेशित असल्याचा प्रकार परीक्षेच्या दोन दिवस आधी लक्षात आला. यामुळे जि.प.चा शिक्षण विभागही अवाक झाला. पंरतु एवढे विद्यार्थी परीक्षेला बसवायचे कुठे? या गोंधळात शिक्षण विभागाने सेनगावातील शिवाजी माध्यमिक विद्यालय व लक्ष्मीबाई येवले विद्यालयात ऐनवेळी परीक्षा केंद्र दिले. गुरुवारी पहिल्या दिवशी या गोंधळातच परीक्षा पार पडली. कापडसिनगी येथील दोन्ही विद्यालयात प्रवेशित असणारे विध्यार्थी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून सेनगाव येथे आले होते. तब्बल सातशे विद्यार्थी परभणी, नांदेड, बीड, लातूर, जालना इ. जिल्ह्यातील असल्याचे परीक्षा केंद्रात प्रवेश दिल्यानंतर समोर आले. विशेष म्हणजे सर्वच परीक्षार्थी हे वयस्कर होते. त्यामुळे दहावी प्रवेशाचा गोंधळ हा पांसिग करणाºया रॅकेटचाच एक भाग असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकाराविरोधात शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदेश देशमुख यांनी आज येवले विद्यालयात शिक्षणाधिकारी चवणे यांची भेट घेऊन धारेवर धरले. तर बोगस प्रवेशांची चौकशी करावी, कापडसिनगी येथील शाळेत कोणत्याही भौतिक सुविधा नसताना मराठवाड्यातील विविध भागात राहणारे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी कसे आले, याचा जाब विचारला. यावेळी तणाव निर्माण झाला होता.प्रकरणाचे गांभीर्य वाढत असल्याने शिक्षणाधिकारी चवणे, गटशिक्षणाधिकारी सीताराम जगताप यांनी चौकशी करण्यासाठी शिवसेनेचा पदाधिकारी, पत्रकार यांना घेऊन कापडसिनगी गाठली. अंदाजाप्रमाणे यावेळी दोन्ही शाळांची बोगसगिरी चव्हाटावर आली.गजानन माध्यमिक विद्यालय शेडमध्ये चालू आहे. शाळा आज सकाळपासून कुलूपबंद होती. येथे दहावीचे ३९८ विद्यार्थी प्रवेशित कसे? याचे उत्तर द्यायला कुणी नसेल तरी शाळेच्या अवस्थेवरून सर्व गौडबंगाल समोर आले. रेखेबाबा विद्यालयाचा कारभार तर नावाच्या फलकावर चालू असल्याचेशिक्षणाधिकाºयांच्या भेटीत समोर आले. येथेही दहावीचे ३०० आहेत. शिक्षण विभागाचे वाभाडे काढणारा व शाळेची दुकानदारी समोर आणणारा प्रकार दिसून आला. शिक्षणाधिकारी चवणे यांनी या दोन्ही शाळेचा पंचनामा केला.सर्व विद्यार्थांचे प्रवेश निर्गम, टी.सी.तपासणी करण्याची गरज आहे. परीक्षा बोर्डानेही या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे योग्य चौकशी झाल्यास रॅकेट उघड झाल्यास नवल नाही.परीक्षेचा पहिल्या दिवशी या वाढीव विद्यार्थ्यांकरिता निर्माण केलेल्या शिवाजी विद्यालय परीक्षा केंद्रावर २९८ पैकी २२२ जणांनी परीक्षा दिली. तब्बल ७२ जण गैरहजर होते. तर येवले विद्यालयात ३९६ पैकी २८३ जणांनी परीक्षा दिली. ११३ विद्यार्थी गैरहजर होते. दोन्ही केंद्रांवर १८९ जण गैरहजर होते. केंद्रावर परीक्षार्थींसोबत आलेल्या अन्य नागरिकांनी गर्दी केली होती. अनेक संशयास्पद, ओळख न पटलेल्या विद्यार्थ्यांनी हॉलतिकीटवर फोटो नसताना परीक्षा देण्याचा प्रकार घडला. एकंदर तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत गोंधळ निर्माण झाला आहे.