शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयांत जागा नाही; कोविड केअर सेंटर मात्र रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST

हिंगोली जिल्ह्यात ऑक्सिजनची समस्या असून खासगी रुग्णालयांनाही ऑक्सिजन मिळत नसल्याने अडचणी येत आहेत, तर शासकीय रुग्णालयांसाठी यंत्रणेकडून धावपळ केली ...

हिंगोली जिल्ह्यात ऑक्सिजनची समस्या असून खासगी रुग्णालयांनाही ऑक्सिजन मिळत नसल्याने अडचणी येत आहेत, तर शासकीय रुग्णालयांसाठी यंत्रणेकडून धावपळ केली जात असल्याने कसातरी नियमित पुरवठा सुरू आहे. अनेकांनी शासकीयमध्ये नाहक ऑक्सिजन बेड अडविल्याचे प्रकारही घडत आहेत. या रुग्णांना इतरत्र हलविताना रुग्णालय प्रशासनाची दमछाक होत आहे. ऑक्सिजन लागलेल्या रुग्णांनी एक ते दोन दिवसांनी सामान्यपणे श्वास घेण्याचा प्रयत्न करून ऑक्सिजनची नोड बंद करणे गरजेचे असताना तो तसाच चालू ठेवून अपव्यय करण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत रुग्णांनी गंभीर होणे गरजेचे असून दुसऱ्याचा हक्क आपण हिरावत असल्याची जाणीव ठेवणे भाग आहे.

कोविडग्रस्तांवर उपचार करणारी रुग्णालये

एकूण बेड ८०० भरलेले बेड ८००

ऑक्सिजन बेड ५७० भरलेले बेड ६६३

कोविड सेंटर : १४

एकूण बेड १८३४ भरलेले बेड ६५८

रुग्णांची बेड मिळविण्यासाठी वणवण

सध्या सर्वच शासकीय रुग्णालयांत बेड मिळत नाहीत. खासगीतही बेड एकेकच शिल्लक असल्याने मोठी अडचण आहे. जेथे बेड रिकामा झाला तेथे रुग्ण हलविण्याची कवायत करावी लागत आहे.

कोविड केअर सेंटरमध्ये ७० टक्के बेड रिकामे

हिंगोली जिल्ह्यात कोविड सेंटरमध्ये शासकीयचेच १८३४ पैकी ११७६ बेड रिकामे आहेत. जवळपास साठ ते सत्तर टक्के बेड रिकामे आहेत. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी कोणतीच अडचण नाही. त्यामुळे रुग्णांनी वेळेत तपासणी करून घेतली तर त्यांना काहीच अडचण जात नाही. मात्र, अनेकजण त्यास विलंब करीत असल्याचे दिसते.

रुग्णांना सौम्य लक्षणे, तरीही रुग्णालयांत

अनेक रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. मात्र, तरीही त्यांना रुग्णालयांत जाण्याचा सोस आहे. असे रुग्ण आधी शासकीयमध्ये प्रयत्न करून नंतर खासगीचा रस्ता धरत आहेत, तर काहीजण लोकप्रतिनिधींचा दबाव आणून रुग्णालयातील बेड अडवून धरत आहेत. यावर जरब बसणे गरजेचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा काहींना केअर सेंटरचा रस्ता दाखविला होता.

जिल्ह्यात सध्या ऑक्सिजनचे बेड शिल्लक नसले तरीही जेवढे रिकामे होत आहेत, तेवढे नवे रुग्ण येत आहेत. एक-दोन दिवसांत वसमतला नवे १०० ऑक्सिजन बेड उपलब्ध होतील. आणखीही यंत्रणा निर्माण होईल. चिंतेचे कारण नाही.

-रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी.