शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीचे रेशीम उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 23:49 IST

रेशीम शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळत असल्याने शेतकºयांनी इतर पिकांना बगल देत रेशीम उद्योगावर भर दिला आहे. मात्र मागील दोन महिन्यांपासून रेशीम निर्माण करणाºया किड्यांना अज्ञात रोगाची लागण झाल्याने उत्पन्नात घट होत असल्याचे शेतकºयांतून बोलल्या जात आहे.

ठळक मुद्देउत्पन्नात घट : पहिल्यांदाच वाईट अनुभव

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : रेशीम शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळत असल्याने शेतकºयांनी इतर पिकांना बगल देत रेशीम उद्योगावर भर दिला आहे. मात्र मागील दोन महिन्यांपासून रेशीम निर्माण करणाºया किड्यांना अज्ञात रोगाची लागण झाल्याने उत्पन्नात घट होत असल्याचे शेतकºयांतून बोलल्या जात आहे.जिल्ह्यात रेशीमचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कमी वेळात जास्त उपन्न देणारा हा उद्योग असल्याने शेतकºयांनी याच पिकाला सर्वाधिक जास्त पंसती दिली आहे. आज ३०० हेक्टरच्या वर तुतीची लागवड झाली आहे. त्यांना प्रत्येक क्राफ्टपासून उत्पन्नही चांगले मिळाले आहे. त्यामुळे शेतकºयांनी रेशीम शेतीवरच भर दिली आहे. पाचही तालुक्यातील गावात रेशीमची शेती सुरु झाली आहे. तर हिंगोली तालुक्यातील पांगरा, भांडेगाव आणि कडती येथे जवळपास २३ शेतकºयांनी दोन वर्षांपासून शेती करणे सुरु केले आहे. मात्र यावर्षी पहिल्यांदाच रेशीम उत्पादन करणारे किडे अंडकोषाबाहेर येताच काहीच हालचाली करीत नसल्याचे शेतकºयांच्या लक्षात आले. त्यामुळे शेतकºयांनी जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयाशी संपर्क साधून याबद्दलची माहिती दिली. अधिकाºयांनी भेटही देऊन विषबाधा झाल्याचे सांगितल्याचे शेतकरी नामदेव लिंबोळे यांनी सांगितले. विषबाधा झाली असती तर एकाच शेतकºयाच्या शेतात झाली असावी परंतु कडती आणि भांडेगाव येथील शेतकºयांनाही हीच अडचण भासत आहे.नुकसान : विभागीय अधिकाºयांना कळविलेभांडेगाव येथे ३, पांगरी २ आणि कडती येथे १८ शेतकºयांनी रेशीम शेती केली आहे. आतापर्यंत चांगले उत्पन्न मिळाले. परंतु मागील दोन महिन्यांपासून रेशीम किडे मृत होत असल्याने उत्पन्नात घट होत आहे. हा प्रकार शेतकºयांनी विभागीय अधिकाºयांना मेलवर निवेदनाद्वारे कळविला आहे.