शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नेहमीच्या वाहतूक कोंडीला हिंगोलीकर वैतागले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 19:49 IST

मुख्य रस्त्यालगतच उभे केली जातात वाहने 

ठळक मुद्देकेवळ टोर्इंगच्या कारवाईमुळे वाहनांना खरंच शिस्त लागेल का?

हिंगोली : शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर दुचाकीसह आता चारचाकी वाहनांनी गराडा घालणे सुरू केले आहे. या खाजगी वाहनांच्या विळख्यामुळे पायी चालणेही कठीण झाले आहे. वाहतूक कोंडीच्या कटकटीला मात्र हिंगोलीकर पुरते वैतागून गेले आहेत. अन् पोलीस प्रशासनाकडूनही ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही, हे विशेष. 

हिंगोली शहरातील मुख्य असलेल्या श्री अग्रसेन चौक ते इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौक पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात खाजगी वाहने उभी केली जातात. विशेष म्हणजे शहरातील या मुख्य चौकातील रस्त्यालगत चारचाकी वाहनांनी गराडा घातल्याचे चित्र दिसून येते. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत तर मागील काही महिन्यांपासून खाजगी चारचाकी वाहने उभी केली जात आहेत. या रस्त्यालगत जवळपास अडीचशे ते तीनशे वाहने उभी असतात. काहीजण तर अस्ताव्यस्त वाहने उभी करीत असल्याने अपघाताच्या अनेकदा घटनाही घडल्या आहेत. पूर्वी हीच वाहने शहरातील रामलीला मैदान येथे उभी केली जात असत. परंतु येथील अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर मात्र खाजगी वाहनांना पर्यायी जागा उपलब्ध करून न दिल्याने आता ही वाहने थेट शहरातील विविध मार्गावरील मुख्य रस्त्यालगतच उभी केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. खाजगी वाहने उभी करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही अनेकदा संबंधित प्रशासनाकडे केली होती. मात्र याबाबत कुठलाच ठोस निर्णय झाला नाही. ही वाहने मोकळी जागा दिसेल तिथे उभी केली जात आहेत. परंतु आता शहरातील मुख्य रस्त्यालगतच वाहने उभी केली जात असल्याने शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. टोर्इंगद्वारे वाहने उचण्याचा सपाटा; केवळ दंड वसुलीवर भरहिंगोली वाहतूक शाखेतर्फे शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या निर्णयाचे हिंगोलीकरांनी प्रथम स्वागत केले. शहरात धडाकेबाज कारवाई सुरू असल्याने वाहतूक शाखेकडे टोर्इंग व्हॅन उपलब्ध झाले. या वाहनात रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकीवर कारवाया केल्या जात असून दंड ठोठावण्यात येत आहे.  परंतु शहरात वाहने उभी कोठे करावीत? असा प्रश्न हिंगोलीकरांना पडला आहे. शहरातील मोजक्याच रस्त्यावर पिवळ्या पट्ट्या आखण्यात आल्या आहेत. परंतु ज्या ठिकाणी ही पिवळी पट्टी नाही, तेथूनही वाहने उचचली जात आहेत. त्यामुळे कोणत्या आधारावर कारवाई करून आमची वाहने उचलून नेण्यात आली? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे. दुचाकीवर कारवाई केली जात असली तर इतर खाजगी वाहने भर रस्त्यालगतच उभी असतात. त्या वाहनांवर कारवाई का होत नाही, याठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी पोहोचत नाहीत का? शहरातील वाहतूक कोंडीचा खरंच प्रश्न मिटावायचा असेल तर केवळ दुचाकींवरच कारवाई का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.

तर कठोर कारवाई-पोलीस अधीक्षक वाहनधारकांनी रस्त्यावर वाहने उभी करू नयेत. जेणेकरून ये-जा करणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होईल. अशा वाहनांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. शहरात वाहने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे इतरत्र वाहने उभी न करता सदर वाहने पार्किंगच्या ठिकाणी उभी करावीत. ये-जा करणाऱ्या वाहतुकीस अडथळा होईल. अशा स्थितीत वाहने कोणीही उभी करू नयेत, अशा प्रकारे वाहने उभी असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी सांगितले. ४हिंगोली शहरातील गांधी चौक, वाहतूक शाखेच्या कार्यालगतच रस्त्याच्या बाजूला,  जि. प. कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा वाहने, इंदिरा गांधी चौक ते महेश चौकात रस्त्याच्याकडेला, टपाल कार्यालय परिसरातही बिनदिक्कतपणे ट्रक उभे केले जात आहेत. तर शहरातील जवाहर रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुतळा परिसर, रेल्वेस्थानक रस्ता आदी ठिकाणी वाहने बिनधास्त उभी असतात.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणTrafficवाहतूक कोंडीHingoliहिंगोली