शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीतील कचरा उचलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : येथील पालिकेने शहरातील सफाईकडे लक्ष केंद्रित केले असून, गल्लीबोळातील कचरा उचलण्याची व्यवस्था केली आहे. ...

ठळक मुद्देस्वच्छ शहर : घंटागाडी, सायकल रिक्षे, ट्रॅक्टर शहरात फिरणार

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील पालिकेने शहरातील सफाईकडे लक्ष केंद्रित केले असून, गल्लीबोळातील कचरा उचलण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी तीन वर्षांचा करार अमरावती येथील संस्थेशी केला असून, शहरातील कचरा गोळा केला जाणार आहे.हिंगोली शहरात १४ डिसेंबर रोजी न. प. अध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडीचा शुभारंभ केला. पालिकेने स्वच्छतेवर सर्वाधिक भर दिला जात आहे. आता शहराची स्वच्छता करण्यासाठी अमरावती येथील बेरोजगाराची क्षितीज नागरीक सेवा सहकारी संस्थेला तीन वर्षांचा करार केला आहे. यामध्ये २० घंटागाड्या, १६ सायकल रिक्षे आणि २ ट्रॅक्टर शहरभर फिरुन गल्लीबोळातून कचरा गोळा करणार आहेत. एवढेच काय, तर ज्या ठिकाणी वाहन जाणार नाही त्या ठिकाणचा कचरा आणण्यासाठी सायकल रिक्षाचीही व्यवस्था केली आहे. गुरुवारी या कचरा गाड्यांचे उद्घाटन झाले. पहिल्याच दिवशी शहरात १० ट्रॅक्टर, १० घंटागाडी, २ टिप्पर आणि २ जेसीबीच्या साह्याने कचरा उचलण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे शहरातून उचलणाºया कचºयावर प्रक्रिया करुन गांडूळ खताची निर्मित्ती करण्याचाही करार उगम सेवाभावी संस्थेसोबत तीन वर्षासाठी केला. दोन ते तीन महिन्यांत गांडूळ खत शेतकºयांना शासकीय दाराने उपलब्ध करुन दिले जाणार आहे.शहरातील नगरपालिकेत घंटागाडीचा शुभारंभ सोहळा नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी रामदास पाटील, गटनेते निहाल भैय्या, नगरसेवक श्रीराम बांगर, बिरजु यादव, जगजित खुराणा, गणेश लुंगे, अनिता सूर्यतळ, जितसिंग शाहू, उमेश गुठ्ठे, नाना नायक, गणेश बांगर, शकील भाई, कय्युम खॉ, बंडू कुटे, राम कदम, संदीप मुदिराज, आमिर अली, अनिल नैनवाणी, दिनेश चौधरी, जावेदराज, आनंदा खंदारे, माबुद बागवान, गोपाल अग्रवाल, आरेफलाला, आरेफ भाई, धबाले, राजेश गोटे, मनीष राठोड, बाळू बांगर आदी उपस्थित होते. तसेच पालिकेच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते. यावेळी त्यांना स्वच्छता मोहिमेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल- पाटील४शहरतील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे व शहर स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी पालिका प्रयत्न करीत आहे. कचरा रस्त्यावर टाकू नये, यासाठी पालिकेने १०० कचरा पेट्यांची व्यवस्था केली असून, त्यापैकी ३० कचरा पेट्या उपलब्ध झाल्या आहेत. शहरात फेरी मारून कचरा गोळा केला जाईल. यासाठी मोबाईल अ‍ॅपची देखील सुविधा आहे. पालिकेने शहर स्वच्छतेच्या दिशेने पाऊले उचलली आहेत. याकडे दुर्लक्ष करून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाºयांवर कारवाई करून दंड आकारला जाईल असे सीओ रामदास पाटील यांनी सांगितले.