शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली शहरांसह गावे अजून अंधारकोठडीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:23 IST

नुकताच टंचाईचा काळ सुरू झाला आणि महावितरणने थकबाकी वसुलीच्या मोहिमेत पाणीपुरवठा योजनांची वीज तोडल्याने अनेक गावांत पाण्यावाचून हाल होत आहेत. तर पथदिव्यांची वीज तोडल्याने हिंगोलीसारखे जिल्हा मुख्यालयच अंधारात असेल तर ग्रामीण भागाची व्यथा सांगायची कुणाला? हा प्रश्न आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नुकताच टंचाईचा काळ सुरू झाला आणि महावितरणने थकबाकी वसुलीच्या मोहिमेत पाणीपुरवठा योजनांची वीज तोडल्याने अनेक गावांत पाण्यावाचून हाल होत आहेत. तर पथदिव्यांची वीज तोडल्याने हिंगोलीसारखे जिल्हा मुख्यालयच अंधारात असेल तर ग्रामीण भागाची व्यथा सांगायची कुणाला? हा प्रश्न आहे.महावितरणच्या थकबाकीचा कोट्यवधींचा डोंगर नाहीसा करणे हे कोणत्याच नगरपालिका व प्रादेशिक योजनांतील ग्रामपंचायतींना शक्य नाही. मात्र त्यात मार्ग काढून ठरावीक रक्कमेचे हप्ते पाडून परतफेड केल्यास त्यात यश येवू शकते. त्यासाठी हिंगोली पालिकेने तर मंत्र्यांकडे बैठक घेवून हा प्रश्न निकाली काढण्यासाठी हप्तेही पाडून घेतले. मात्र तेही भरले जात नसल्याचे सांगून महावितरणने वीज तोडली. हीच गत वसमत, कळमनुरी व सेनगावची असून चालू देयकही भरले नसल्याने या सर्वांचीच वीज तोडली आहे. पाणीपुरवठ्यासाठी जशी धडपड केली जात आहे, तशी पथदिव्यांसाठी कोणीच करताना दिसत नसल्याने शहरे अंधारातच आहेत. ग्रामीण भागातही हेच चित्र आहे.पथदिव्यांचे हिंगोली विभागात १२१ ठिकाणची ११.८३ कोटी, वसमत विभागात २0५ ठिकाणची १२.0९ कोटी, कळमनुरी विभागात १४९ ठिकाणची ११.५३ कोटी, सेनगाव विभागात १३५ ठिकाणची ८.६0 कोटी, औंढा ना. विभागात १४३ ठिकाणची १४.४४ कोटी रुपये थकबाकी आहे. त्यामुळे या सर्व जोडण्या तोडण्याचा महावितरणचा आदेश आहे. यापैकी सध्या हिंगोलीत ७७, वसमतला २0५, कणमनुरीत १५ ठिकाणची जोडणी तात्पुरती तोडली आहे. यापैकी केवळ वसमतला ७७ जोडण्यांचे १४ लाख जमा झाले.पाणीपुरवठा योजनांचेही वेगळे चित्र नाही. हिंगोली विभागात ६७ जोडण्यांचे ५0 लाख, वसमत विभागात १४५ जोडण्यांचे ३.६१ कोटी, कळमनुरीत १९१ जोडण्यांचे ५.४१ कोटी, सेनगावात १0८ जोडण्यांचे ४.२१ कोटी तर औंढ्यात १५ जोडण्यांचे २४ लाख थकलेले आहेत. या सर्व जोडण्यांचा वीजपुरवठा खंडित केला असून वसमतमध्येच केवळ १४५ पैकी १३७ जोडण्या तोडल्या. ८ जोडण्यांचे ५८ लाख वसूल झाले आहेत.पथदिव्यांबाबत नगरपालिका व नगरपंचायतीही त्याच रांगेत आहेत. हिंगोलीत १७७ जोडण्यांचे ६.२५ कोटी, वसमतला ७७ जोडण्यांचे ४.१७, कळमनुरीत २३ जोडण्यांचे ४५ लाख, सेनगावात सात लाख तर औंढ्यात १४ जोडण्यांचे १.0४ कोटी थकले आहेत. यात हिंगोलीत ७ लाख, वसमतला १४ लाख भरले आहेत. तर औंढ्यातही काही रक्कम भरली आहे. वसमतला कागदावर पथदिवे बंद असले तरीही प्रत्यक्षात मात्र सुरू आहेत.हिंगोली शहरातील पथदिवे बंद असल्याने होत असलेली ओरड लक्षात घेता नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी, उपअभियंता डी.ई. पिसे आदींची भेट घेतली. तर आता दहा लाख, ६ मार्चला १५ लाख व उर्वरितरक्कम मार्च एण्डला भरण्याचे आश्वासन दिले. याबाबत अधीक्षक अभियंत्यांशीही चर्चा झाली. मात्र दुपारपर्यंत काहीच तोडगा निघाला नव्हता. सायंकाळपर्यंत यावर तोडगा न निघाल्यास नागरिकांनीच आपापल्या घरासमोर दिवे लावावेत, असे आवाहन बांगर यांनी केले.सध्या कळमनुरी व औंढ्यात पथदिवे सुरू केले आहेत. सेनगाव व हिंगोलीत मात्र पथदिवे बंद आहेत. वसमतला कागदावर बंद आहेत. तर ग्रामीण भागातील बहुतांश पाणीपुरवठा योजना व पथदिवे बंदच आहेत.