शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली दहाव्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST

हिंगोली : कोरोना लसीकरणात सुरुवातीला आघाडीवर असलेला हिंगोली जिल्हा आता दहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. आजपर्यंत ठरलेल्या नियोजनानुसार ८५.२ ...

हिंगोली : कोरोना लसीकरणात सुरुवातीला आघाडीवर असलेला हिंगोली जिल्हा आता दहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. आजपर्यंत ठरलेल्या नियोजनानुसार ८५.२ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील पाच केंद्रांवरून लसीकरण सुरू आहे.

हिंगोली जिल्ह्यात ६५०० लसींचा साठा प्राप्त झाला होता. यात जवळपास तीन हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण हाेणार आहे. काही डोस वेस्ट जाणार आहेत. यामध्ये हिंगोली जिल्ह्यात सुरुवातीला ठरवलेले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण होत असल्याने जिल्हा अव्वल स्थानी होता. आता काही जिल्ह्यांत उद्दिष्टापेक्षाही जास्तीचे काम होत असल्याचे दिसून येत आहे.

अनेक कर्मचारी व अधिकारी मध्यंतरी ही लस घेण्यास घाबरत होते. काहींना अंग जड पडणे, डोकेदुखी, ताप येणे असा त्रास होत होता. त्यामुळे गंभीर त्रास कुणालाच झाला नाही. मात्र, तरीही काही अधिकारी व कर्मचारी ही लस घेण्यासाठी चालढकल करीत असल्याचे समोर आले होते. आता पुन्हा पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. जर या कर्मचाऱ्यांना त्रास झाला तर लसीकरणावर परिणाम होणार नाही, याची काळजी म्हणून सध्या फक्त खाजगी आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होत आहे.

जिल्ह्याला डोसचा दुसरा साठा कधी मिळणार?

हिंगोली जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात ६५०० डोस प्राप्त झाले होते. त्यातून ३ हजार कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांना या बॅचची लस दिली. त्याच बॅचची एक लस राखीव ठेवली असून ती या कर्मचाऱ्यांना मर्यादित कालावधीनंतर दिली जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात महसूल कर्मचाऱ्यांना लस दिली जाण्याची शक्यता असून त्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा डाटा गोळा करण्यास सांगितले आहे. तो वेबसाइटवर अपलोड केला जाणार आहे.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी याबाबत सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी काय नियोजन करायचे याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार ३१ जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात एकूण ३ हजार आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. आतापर्यंत २३०१ जणांना ही लस दिली आहे. जिल्ह्यातील पाच केंद्रांवरून हे काम सुरू आहे. येत्या बुधवारपर्यंत जिल्ह्याचे १०० टक्के लसीकरण उद्दिष्ट पूर्ण होईल.

-डाॅ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

महिलांचे प्रमाण जास्त

हिंगोली जिल्ह्यात झालेल्या लसीकरणामध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. परिचारिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, डाॅक्टर महिलांची संख्या मोठी असल्याने त्यांचे प्रमाणही लसीकरणात जास्त आहे. ६० ते ७० टक्के महिलाच असल्याचे दिसून येत आहे, तर महिला लस घेण्यासाठी पुढे येत आहेत.

धुळे १०८ टक्के

अमरावती १०६ टक्के

बीड ९९ टक्के

वर्धा ९६.५ टक्के

सातारा ९३.९ टक्के