शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत क्षयरूग्ण शोधण्यासाठी ‘घर चलो मोहीम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 23:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे ४ ते १८ डिसेंबर या कालावधीत क्षयरूग्णांचा शोध घेऊन त्यांना मोफत ...

ठळक मुद्देजिल्ह्यात १ लाख १३ हजार ३४५ जोखीमग्रस्त लोकसंख्येचा सर्व्हे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे ४ ते १८ डिसेंबर या कालावधीत क्षयरूग्णांचा शोध घेऊन त्यांना मोफत औषधोपचारासाठी ‘घर चलो मोहीम’ राबविण्यात येत आहे. आतापर्यंत १६ पेक्षा अधिक क्षयरोगी रूग्णांचा शोध घेण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी दिली.क्षयरोगाविषयी समाजात अधिक जनजागृती होणे गरजेचे आहे. अजूनही क्षयरोगाबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे क्षयरोगाचे समूळ उच्चाटनासाठी रूग्णांच्या नियमित औषधोपचारांबरोबरच अधिक जनजागृती मोहीम राबविणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे क्षयरोग बाधित रुग्ण अर्धवट उपचार घेतात. त्यामुळे क्षयरोग बरा होत नाही. त्यामुळे क्षय रूग्णांनी डॉक्टरांनी दिलेला संपूर्ण डोस वेळेत व नियमित घेणे आवश्यक आहे. शिवाय या रुग्णांना सकस आहार मिळणे महत्त्वाचे आहे.मोहिमेत मोफत तपासणी- संशयित रुग्णांची थुंकी तपासणी व क्ष-किरण तपासणी मोफत केली जात आहे. त्यामुळे ज्यांना दोन आठवड्यांपासून खोकला, ताप, वजन कमी होणे, थुंकी वाटे रक्त पडणे इत्यादी आढळून येणाºया व्यक्तींनी या मोहिमेमध्ये मोफत थुंकी तपासणीसाठी जवळच्या रूग्णालयात तपासणी करून घ्यावी. क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांवर मोफत औषधोपचार केले जात आहेत.सुधारीत राष्टÑीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिम २०१७ बाबत आढावा बैठक पार पडली.सदर बैठकीत जिल्हाधिकाºयांनी उपस्थित वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व इतर आरोग्य कर्मचाºयांना शोधमोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या विशेष सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने मोहीम राबविली जात आहे.जोखीमग्रस्त गावांतील भागाकडे विशेष लक्षमोहिमेमध्ये झोपडपट्टी, उसतोड मजूर, विटभट्टी मजूर, रस्ते व बांधकाम मजूर, निराधार, निराश्रित, अनाथाश्रमे, वृद्धाश्रमे, स्थलांतरीत, नॅको तर्फे निवडलेली जोखीमग्रस्त गावांतील अतिजोखमीच्या भागामध्ये सर्व्हे होणार आहे. क्षयरोग नियंत्रणासाठी जिल्ह्यात १ लाख १३ हजार ३४५ जोखीमग्रस्त लोकसंख्येचा सर्व्हे आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत घरोघरी जावून केला जात आहे. संशयीत क्षयरुग्णांची तपासणी आवश्यकता असल्यास सीबीनॅट मशीनद्वारे केली जात आहे.