शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत विभागीय क्रीडा स्पर्धेचा थाटात समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 23:56 IST

शहरातील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर शासकीय, अनुदानित आश्रमशाळा विभागीय क्रीडा स्पर्धेचा ९ डिसेंबर रोजी मोठ्या थाटात समारोप करण्यात आला. मागील तीन दिवसांपासून या स्पर्धा सुरू होत्या. शनिवारी विजेत्या संघांचा तसेच खेळात सहभागी सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.

ठळक मुद्देसांस्कृतिक कार्यक्रम: क्रीडा स्पर्धा आयोजक समितीने रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर शासकीय, अनुदानित आश्रमशाळा विभागीय क्रीडा स्पर्धेचा ९ डिसेंबर रोजी मोठ्या थाटात समारोप करण्यात आला. मागील तीन दिवसांपासून या स्पर्धा सुरू होत्या. शनिवारी विजेत्या संघांचा तसेच खेळात सहभागी सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.यावेळी आ. तानाजी मुटकुळे, आ. संतोष टारफे, जि.प. सदस्य सतीश पाचपुते, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, राहुल मदणे, विभागीय वनाधिकारी केशव वाबळे, मुख्याधिकारी रामदास पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, संजय पवार, ओम कोटकर, के. के. शिंदे, संतोष वेरूळकर, जगदाळे, धारणे, प्रशांत बोडखे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूवृत्ती निर्माण केल्यास ते देशपातळीवर नाव उंचावतील, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रा. जवाहर गाढवे यांनी केले. क्रीडा स्पर्धा यशस्वीतेसाठी बचाटे, बाचा, जाधव, माटे, प्रा. तुळजादास देशपांडे, गणेश कावरखे, शिवाजी सूर्यवंशी, प्रा. तुकाराम मोरे यांच्यासह अनुदानित व शासकीय आश्रमशाळेतील सर्व कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांना सुविधाक्रीडा स्पर्धेत सर्व सहभागी विद्यार्थ्यांची राहण्याची, भोजनाची सुविधा करण्यात आली होती. तसेच प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड मागील तीन दिवसांपासून क्रीड स्पर्धेच्या मैदानात तळ ठोकून होते. यावेळी नियोजनबद्ध काम करणाºयांचाही राठोड यांनी सत्कार केला.सांघिक खेळातील विजयी संघकबड्डी स्पर्धा-१४ वयोगटातील मुलांचा विजेता संघ किनवट तर उपविजेता पांढरकवडा, १४ वयोगटातील मुली विजेता संघ धारणी तर उपविजेता औरंगाबाद, १७ वयोगट मुले विजेता संघ धारणी तर उपविजेता औरंगाबाद, १७ वयोगटातील मुलीं धारणी संघ विजेता, तर पांढरकवडा येथील संघ उपविजेता घोषित करण्यात आला. १९ वयोगटातील मुले कळमनुरी संघ विजेता तर धारणी संघ उपविजेता म्हणून घोषित केला. १९ वयोगटातील मुलीमध्ये विजेता संघ धारणी तर उपविजेता पुसद संघ. -खो-खो स्पर्धा - १४ वयोगटातील मुले विजेता संघ धारणी तर उपविजेता किनवट संघ ठरला. १४ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये विजेता अकोला संघ तर उपविजेता धारणी घोषीत केला. १७ वर्षे वयोगटातील मुले विजेता संघ अकोला तर उपविजेता किनवट संघाने बाजी मारली. १७ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये विजेता संघ धारणी तर उपविजेता संघ अकोला. १९ वर्षे मुलांच्या वयोगटातील विजेता संघ धारणी तर उपविजेता अकोला. १९ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये विजेता संघ धारणी तर उपविजेता पुसद. -व्हॉलीबॉल स्पर्धा -१४ वयोगटातील विजेता संघ धारणी तर उपविजेता कळमनुरी. १४ वर्षे वयोगटात मुलींध्ये विजेता धारणी तर उपविजेता पूसद. १७ वर्षे वयोगटातील मुले यामध्ये विजेता संघ धारणी, तर उपविजेता किनवट. १७ वर्षे मुलींच्या वयोगटातून विजेता संघ धारणी तर उपविजेता कळमनुरी. १९ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये विजेता संघ धारणी तर उपविजेता पुसद. १९ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये विजेता संघ धारणी तर उपविजेता किनवट. हॅन्डबॉल स्पर्धा -१४ वर्षे वयोगटातील मुले यामध्ये विजेता धारणी तर पांढरकवडा. १४ वर्षे वयोगटात मुलींमध्ये विजेता संघ अकोला तर उपविजेता पांढरकवडा. १७ वयोगट मुले विजेता संघ धारणी उपविजेता अकोला संघ. १७ वयोगट मुली विजेता अकोला तर उपविजेता पांढरकवडा. १९ वर्षे मुले विजेता धारणी तर उपविजेता पांढरकवडा. १९ वयोगट मुली विजेता संघ धारणी तर उपविजेता पांढरकवड आदी संघांनी बाजी मारली. विजेत्या व उपविजेत्या संघातील खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.