कळमनुरी तालुक्यातून सर्वाधिक सहभाग
या उपक्रमामध्ये कळमनुरी तालुक्यातील विद्यार्थी सर्वाधिक सहभागी असल्याचे दिसून येत आहे. हा तालुका जिल्ह्यात अव्वल आहे. यात कळमनुरी ५८.०३ टक्के, सेनगाव ५१.६१ टक्के, वसमत ४६.८२ टक्के, औंढा नागनाथ ४२.८० टक्के, हिंगोली ४०.४२ टक्के असे तालुकानिहाय चित्र आहे.
राज्यात अव्वल येण्याचा प्रयत्न
हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश शाळा व शिक्षकांनी आता ही बाब मनावर घेतली आहे. यात आता चांगले काम सुरू आहे. पुढील काही दिवसांत जिल्हा राज्यात अव्वल यावा, यासाठी प्रयत्न आहेत. विद्यार्थ्यांंनाही याचा फायदा होणार आहे.
- संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी, हिंगोली
सर्व घटकांच्या सहकार्याचा परिणाम
यामध्ये डायटसह शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक अशा सर्व घटकांनी प्रयत्न केले. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात शाळांचा सहभाग वाढत आहे. मुलांना व्हॉट्सॲपवर लिंक पाठवून सहभागासाठी मार्गदर्शन केले जात आहे. शिवाय या प्रश्नावलीचा मुलांना फायदा होत असून, ही बाब त्यांनी इतर मुलांना सांगून यात आणखी काम वाढण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यातच आता तालुक्यांमध्ये यासाठी स्पर्धा लागली असून, आपल्या तालुक्याची कामगिरी उंचावण्यासाठी कामाला लागले आहेत.