शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन पथक नेमली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:42 IST

जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून चोरट्यांनी धुडगूस घातला असून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. घराचे कुलूप तोडून सोने-चांदीचे दागिने, रोकड व दुचाकी चोरींच्या घटनांत वाढ झाली आहे. चोरींच्या घटनामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेणे एक आव्हान उभे राहिले आहे. मागील पंधरा दिवसांत १२ चोरींच्या गुन्ह्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली.

ठळक मुद्देपोलिसांपुढे आव्हान : कुलूप असलेल्या घरांवर नजर; लोखंडी कपाट तोडण्यात चोरटे तरबेज

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून चोरट्यांनी धुडगूस घातला असून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. घराचे कुलूप तोडून सोने-चांदीचे दागिने, रोकड व दुचाकी चोरींच्या घटनांत वाढ झाली आहे. चोरींच्या घटनामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेणे एक आव्हान उभे राहिले आहे. मागील पंधरा दिवसांत १२ चोरींच्या गुन्ह्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली.जिल्ह्यात घराफोड्यांचे प्रमाण वाढल्याने चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हानच निर्माण केले आहे. विशेष म्हणजे घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घराचे कुलूप तोडून चोºयांचे प्रमाण जास्त आहे. डिसेंबर महिन्यात जास्तीत-जास्त चोरीच्या घटना घडल्या आहेत. मागील पंधरा दिवसांत चोरीचे तब्बल १२ गुन्हे दाखल झाल्याची नोंद पोलीस दरबारी आहे. घटनांची संख्या लक्षात घेता पोलिसांना जणू चोरट्यांनी एकाप्रकारे आव्हानच केले आहे. विशेष म्हजणे तपासिक अंमलदाराकडून चोरट्यांचा कसून शोध घेतला जात असला तरी, अद्याप एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. चोºयांच्या घटनांमुळे एखादी परराज्यातील टोळी हिंगोली जिल्ह्यात दाखल तर झाली नाही, असा अंदाज काढला जात आहे. वसमत शहर व कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व परिसरात जास्तीत जास्त चोºयांच्या घटना घडल्या आहेत. तसेच हिंगोली शहर व ग्रामीण भागातही चोरट्यांनी हात साफ केला आहे. घरफोडी करून लोखंडी कपाट तोडण्यात चोरटे तरबेज असल्याचे दिसून येत आहे. पोलीस प्रशासनाकडून चोरट्यांचा कसून शोधही घेतला जात आहे. लवकरच चोरटे गजाआड होतील, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.डिसेंबर महिन्यात सर्वाधिक घडल्या चोरीच्या घटनाकळमनुरी तालुक्यातील बाळापुरातही चोरींचे प्रमाण जास्त आहे. १५ डिसेंबर रोजी भरदिवसा शिक्षक कॉलनीतील एका घराचे कुलूप तोडून दीड लाख रुपये नगदी व सोन्याचे दागिने असा २ लाख २७ हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. वसमत तालुक्यातील वर्ताळा येथील शेतातून चोरट्यांनी विहिरीतील विद्युत मोटार व इतर साहित्य एकूण २३ हजार ५२० रूपयांची चोरी केली. याप्रकरणी ४ डिसेंबर रोजी कुरूंदा ठाण्यात चोरीची नोंद केली. ७ डिसेंबर रोजी वसमत तालुक्यातील हट्टा ठाण्यातही चोरीचा गुन्हा दाखल आहे. वसमत येथील रेल्वेस्थानकावर एकास तलवारीच्या धाकावर लुटले, असून याप्रकरणी १ डिसेंबरला जबरी चोरीचा गुन्हा वसमत शहर ठाण्यात दाखल आहे. हिंगोली शहरातील महसूल कॉलनी येथे घराचे कुलुप तोडून सोने-चांदीचे दािगने लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी १२ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल आहे. तर १४ डिसेंबर रोजी वसमत येथील मोंढ्यातून चोरट्यांनी दुचाकी लंपास केली. यासह विविध घटनांच्या नोंदी पोलीस दरबारी दाखल असून तपास सुरू आहे.