शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

हिंगोली जिल्हा रूग्णालय सापडले अस्वच्छतेच्या विळख्यात; पिचकाऱ्यांनी रंगल्या भिंती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 19:26 IST

रुग्णांसोबतच्या नातेवाईकांनाच उपचार घेण्याची वेळ

ठळक मुद्देरूग्णालयात येणाऱ्यांना नाकाला रूमाल लावून येण्याची वेळ रूग्णालयाच्या वरच्या मजल्यावरही अस्वच्छता असते

हिंगोली : जिल्हा रूग्णालय दिवसेंदिवस अस्वच्छतेच्या विळख्यात सापडत चालले आहे. त्यामुळे येथे उचारासाठी येणारे रूग्णांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून नातेवाईकांनाही अ‍ॅडमिट होण्याची वेळ आली आहे. 

हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची मोठी गर्दी असते. परंतु मागील काही दिवसांपासून येथील स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. रूग्णालयाची टोलेजंग इमारत असूनही या ठिकाणी स्वच्छता मोहिमेवर भर दिला जात नाही. परिणामी, रूग्णालयात येणाऱ्यांना नाकाला रूमाल लावून येण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे रूग्णालयाच्या वरच्या मजल्यावरही अस्वच्छता असते, शिवाय गुटखा खाऊन थुंकल्याने भिंती व खिडक्या रंगल्या आहेत. धूम्रपान निषेध व कार्यवाहीचे जागो-जागी मोठ-मोठे फलक बसविलेले आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र कार्यवाही होत नाही, की स्वच्छतेची दखल घेतली जात नाही. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वीच जिल्हा रूग्णालयातील अस्वच्छतेबाबत आ. तान्हाजी मुटकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर काही दिवस रूग्णालयातील स्वच्छतेवर भर देण्यात आला. आता परत ‘जैसे थे’ स्थिती आहे. अनेक वार्डात कचरापेट्या नसतात. त्यामुळे नाईलाजाने उघड्यावरच कचरा फेकला जातो. 

प्रत्येकाने रूग्णालयाला ‘आपले’ घर समजावे....जिल्हा रूग्णालयातील स्वच्छतेवर भर देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिवाय रूग्णालय हे आपले घर समजावे म्हणजे आपसूकच मोठ्या प्रमाणात अस्वच्छता जमा होणार नाही. विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपासून सफाई कामगार नसल्यामुळे अस्वच्छतेची समस्या होती. परंतु आता सफाई कामगारांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे रूग्णालय चका-चक करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शिवाय कोणीही उघड्यावर कचरा टाकू नये. - जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास

टॅग्स :Hingoli civil hospitalजिल्हा रुग्णालय हिंगोलीHingoliहिंगोलीdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल