शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

हिंगोलीत महापुरूषांच्या पुतळ्यांना होर्डिंग्जचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 11:49 PM

शहरातील विविध चौक परिसर व सार्वजनिक ठिकाणे होर्डिंग व बॅनरने हाऊसफुल झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे महापुरूषांच्या पुतळ्यांचीही यातून सुटका झाली नाही. शहरातील चौका-चौकात तसेच पुतळा परिसरात राजकीय व वाढदिवसानिमित्त लावलेल्या होर्डिंगचा विळखा घातला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील विविध चौक परिसर व सार्वजनिक ठिकाणे होर्डिंग व बॅनरने हाऊसफुल झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे महापुरूषांच्या पुतळ्यांचीही यातून सुटका झाली नाही. शहरातील चौका-चौकात तसेच पुतळा परिसरात राजकीय व वाढदिवसानिमित्त लावलेल्या होर्डिंगचा विळखा घातला आहे.विविध राजकीय पुढाऱ्यांचे तसेच वाढदिवस, विविध प्रतिष्ठानांच्या डिजिटल बॅनरने सध्या हिंगोली शहराला विळखा घातला आहे. यात अनेकांनी तर नगरपालिकेची कुठलीच परवानगी न घेता बॅनर सार्वजनिक ठिकाणी लावले आहेत. याकडे पालिकेची संबंधित यंत्रणाही लक्ष देण्यास तयार नाही. शिवाय पालिकेतर्फे केवळ थातूर-मातूर कारवाई केली जाते. परिणामी ‘जैसे थे’ चित्र निर्माण होत आहे. हिंगोली शहरातील मुख्य रस्त्यावरील श्री अग्रसेनजी महाराज चौक यांचा पुतळा तर संपूर्ण होर्डिंगने भरून गेला आहे. तसेच महात्मा गांधी चौक परिसरालाही होर्डिंग्जचा विळखा आहे. शहरातील महावीर स्तंभाजवळ तर पालिकेचेच बॅनर लावल्याचे चित्र आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरच हातगाडे, आॅटो व खाजगी वाहने बिनदिक्कतपणे उभे केली जातात. त्यामुळे होर्डिंग्जचा त्रास वाचला. मंगळवारी बाजाराच्या दिवशी तर येथून पायी चालणेही कठीण होते, शिवाय वाहतुकीची कोंडी होऊन किरकोळ अपघाताच्या घटनाही घडतात. साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळा परिसरात केवळ खड्डे खोदून ठेवले आहेत.काही ठिकाणी नगरपालिकेची परवानगी घेऊन होर्डिंग्ज लावले जात आहेत. मात्र अनेक अवैध होर्डिंग्ज शहराला बकालावस्थेच्या खाईत ढकलत आहेत. विशेष म्हणजे होर्डिंग्ज कुठे लावावीत, याचा तर काही नियमच नाही. त्यामुळे महापुरुषांचे पुतळे, स्तंभ या होर्डिंग्जमागे दडत आहेत. पुढाºयांना प्रसिद्धीचा सोस असतो म्हणून ते याचे सोयरसुतक पाळत नसले तरीही पालिकेनेही स्वत:च्या होर्डिंग्ज अशाच पद्धतीने लावल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीcity chowkसिटी चौक