शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छतेकडून हिंगोली शहर धावतेय निर्मळतेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : एकेकाळी शहरातील अनेक रस्त्यांवर कचरा साचला होता. मोडक्या-तोडक्या कचराकुंड्यांतून ओसंडून वाहणारा कचरा, त्यात फिरणारी ...

ठळक मुद्देहिंगोली पालिकेची साद : स्वच्छतेचे महत्त्व पटलेय

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : एकेकाळी शहरातील अनेक रस्त्यांवर कचरा साचला होता. मोडक्या-तोडक्या कचराकुंड्यांतून ओसंडून वाहणारा कचरा, त्यात फिरणारी गुरे अन् अवघा परिसरच दुर्गंधीमय असे चित्र अनेक भागात दिसत होते. मात्र हे चित्र बदलू लागले आहे. काही ठिकाणी कचराकुंड्या आल्या आहेत. तर काही ठिकाणी घंटागाडीच कचरा नेण्यासाठी अवतरत आहे. या गाडीच्या घंटीचा नाद ऐकताच नागरिक कामे सोडून कचरा नेवून देताना दिसत आहेत.पालिकेने रात्रंदिवस शहर स्वच्छतेचे स्वप्न पाहिले होते आणि ते नागरिकांच्या सहकार्याने प्रत्यक्षातही उतरले आहे. यासाठी नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याने, पालिकेने स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या टप्प्यात बक्षीस जाहीर केले आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ हा केंद्र शासनाचा उपक्रम असून यात हिंगोलीचा समावेश आहे. त्यामुळे आपापल्या वॉर्डातील नगरसेवकांनी स्वच्छतेची जबाबदारी उचलली असून, स्वखर्चाने रस्ते नाल्या व कुंड्या बसविण्यास सुरूवात केली आहे. तर बंद पडलेले पथदिवे दुरुस्त करुन घेण्यावर भर देत आहेत. तर पालिकेने रुग्णालय स्वच्छता, शाळा, व्यापारक्षेत्र, सोसायटी, हॉटेल येथे विविध स्पर्धांचे आयोजन करुन विजेत्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार केला जाणार आहे. तर पालिकेने तयार केलेल्या स्वच्छता अ‍ॅपवरही आलेल्या तक्रारीचे निराकरण वेळीच केल्या जात आहे. तसेच काही संस्था व बँकाही या उपक्रमात हिरीरीने सहभागी झाल्या आहेत. हाच उत्साह राहिल्यास लवकरच स्वच्छ शहराचे स्वप्न साकारणे शक्य आहे.स्वच्छतेवर भर : घंटागाडीच्या आवाजाकडे लक्षशहरातील स्वच्छतेचे कंत्राट दिल्याने शहरभर फिरणाºया पालिकेच्या घंटागाडीच्या आवाजावर लक्ष केंद्रित केले जात आहे. एवढेच काय तर शहरातील नागरिक केरकचरा रस्त्यावर आणून वाहनाची प्रतीक्षा करीत आहेत. त्यामुळे आपसूकच शहरात स्वच्छता दिसत आहे. तसेच नेहमीच रस्त्यावर कचरा पसरणाºया ठिकाणी कचरा पेट्या ठेवल्या जात आहेत. त्यामुळे त्या भागातीलही नागरिकांना कचरापेटीत कचरा टाकण्याची सवय झाली आहे. हीच सवय काम राहावी जेणेकरुन स्वच्छ व सुंदर शहर राहण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल.