शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील मराठा मोर्चासाठी हिंगोलीत बाईक रॅली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 11:20 IST

हिंगोली, दि. 5 -  मुंबई येथे ९ ऑगस्ट रोजी होणा-या राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून हिंगोलीत ५ ...

हिंगोली, दि. 5 -  मुंबई येथे ९ ऑगस्ट रोजी होणा-या राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून हिंगोलीत ५ ऑगस्ट रोजी दुपारी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. जिल्हाधिका-यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देवून रॅलीचा समारोप झाला.गतवर्षी नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे मराठा समाजातील भगिनीवर अत्याचार झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यात ५७ ठिकाणी मराठा क्रांती मोर्चे निघाले. प्रत्येक मोर्चात लाखोच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते. अगदी शांततेत व शिस्तीत हे मोर्चे पार पडले. मात्र सरकारने अशा त्याकडे कानाडोळा करून मराठा समाजाला केवळ आश्वासनेच दिली. यामुळे मुंबई येथे ९ ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची जनजागृती म्हणून ५ ऑगस्ट रोजी शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये तीच शिस्त आणि तोच उत्साह पहावयास मिळाला. रॅलीत सहभागी युवकांची संख्या लक्षणीय होती. शिवाय महिलाही मागे नसल्याचे दिसून आले.या रॅलीत जोरदार घोषणाबाजीही झाली. यात  ये रॅली तो झॉंकी है, मुंबई अभी बाकी है, अशा घोषणा दिल्या. तर जय जिजाऊ... जय शिवराय असा जयजयकार करीत चलो मुंबईचा नारा देण्यात आला. ही रॅली सकाळी ११ वाजता हिंगोली शहरातील छत्रपती शिवरांयाच्या नियोजित पुतळयापासून सुरू झाली. त्यांनतर रिसाला बाजार, अकोला बायपास, आदर्श कॉलेज, सरस्वती नगर, रिसाला बाजार, पोष्ट ऑफीस रोड, जवाहर रोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधीध चौक, इंदिरा गांधी चौक मार्गे  जिल्हाधिकारी कार्यालय जावून धडकली. यावेळी मुंबई मोर्चाबदल मार्गदर्शन करण्यात आले. समाजातील पाच मुलींच्या वतीने जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. त्यात म्हटले की, मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्यात यावे, कोपर्डी घटनेतील आरोपीला फासावर चढवावे, तसेच शेतक-यांशी निगडित विविध मागण्याही निवेदनात आहेत. मराठा समाजांच्या भावनांचा उद्रेक होत असून उपरोक्त मागण्या तत्काळ मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा दिला. रॅलीत समाज बांधव हजारोंच्या सख्यंने सहभागी झाला होतारॅलीत महिलाही सहभागीहिंगोलीत मुंबईच्या मोर्चाच्या जनजागृतीच्या निमित्ताने निघालेल्या मोटार सायकल रॅलीत पहिल्यांदाच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. प्रामुख्याने तरुणींची लक्षणीय उपस्थिती होती. डोक्यावर फेटे बांधून वेगळ्या वेशभूषेत या महिला सहभागी होत्या.तीच शिस्त अन् तोच उत्साह़हिंगोलीत मोटारसायकल रॅली निघाली असता तीच शिस्त अन् तोच उत्साह दिसून आला. मोटारसायकलस्वार अगदी नियोजनबद्धरीत्या रॅलीत सहभागी झाले होते. ज्येष्ठ नागरिकांसह समाजातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रस्त्याने जाताना आपल्या दुचाकीचा कुणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जात होती. जिल्हा कचेरीवर पोहोचल्यानंतर सर्वांनी शिस्तीत आपल्या मोटारसायकली गेटसमोर लावल्या होत्या. त्यांनतर मोर्चाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांना दिल्यानंतर ही रॅली विर्सजित करण्यात आली.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा