शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

सालापूर येथील मतदान केंद्रावर सर्वाधिक मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:26 IST

तालुक्यातील सर्वात कमी मतदान आखाडा बाळापूर येथील छत्रपती शाहू विद्यालय येथील खोली क्रमांक ३ मधील मतदान केंद्रावर ४९.०५ टक्के ...

तालुक्यातील सर्वात कमी मतदान आखाडा बाळापूर येथील छत्रपती शाहू विद्यालय येथील खोली क्रमांक ३ मधील मतदान केंद्रावर ४९.०५ टक्के मतदान झाले. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ७८.८३ टक्के मतदान झाले होते. यावर्षीच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. ९० ग्रामपंचायतींसाठी ६२ हजार १७७ पुरुष, ५६ हजार ६८१ महिला असे एकूण १ लाख १८ हजार ८५८ मतदार होते. त्यापैकी ५० हजार ६०४ पुरुष व ४४ हजार ६८६ महिला असे एकूण ९५ हजार २९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदानाची टक्केवारी ८०.१७ टक्के आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान झाले. मतमोजणी १८ जानेवारी रोजी तहसील कार्यालयात होणार आहे. तालुक्यातील सेलसुरा येथील खोली क्रमांक ३ मध्ये ९४.५८ टक्के, सालापूर येथील खोली क्रमांक २ मध्ये ९५.२४ टक्के, सालापूर येथील खोली क्रमांक ३ मध्ये ९४.०५ टक्के मतदान झाले. कळमकोंडा येथे ९४.१२ टक्के मतदान झाले. ९० टक्क्यांच्यावर अनेक ग्रामपंचायतीमध्ये मतदान झाले आहे. तालुक्यात २७५ मतदान केंद्रे असून त्यापैकी १९ मतदान केंद्रे संवेदनशील होती. या संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.

२५ टेबलवर होणार मतमोजणी

कळमनुरी तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. तहसील कार्यालयात १८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेपासून २५ टेबलवर मतमोजणी होणार आहे. १३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. मतमोजणीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पर्यवेक्षक सहाय्यक पर्यवेक्षक यांच्‍या नियुक्त्या केल्या आहेत. २५ टेबलद्वारे ११ फेऱ्यांतून मतमोजणी होणार आहे. मतमोजणी कक्षात उमेदवार अथवा त्याच्या प्रतिनिधीला प्रवेशाची मुभा राहणार आहे. तालुक्यात २७५ मतदान केंद्र असून पहिल्या फेरीत २५ मतदान केंद्राची व त्यानंतर उर्वरित मतदान केंद्रावरील मतदानाची मतमोजणी होणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती तहसीलदार दत्तू शेवाळे, नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांनी दिली.