शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मदतनिसांना मिळेना मानधन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:14 IST

जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन शिजविणाऱ्या मदतनिसांच्या मानधनाचा प्रश्न अद्याप निकाली लागला नाही. शिवाय इंधन व भाजीपाल्याची रक्कमही अनेकांना मिळाली नाही. त्यामुळे मदतनिसांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असून जिल्हाभरातील मदतनिसांच्या मानधनाचा प्रश्न कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन शिजविणाऱ्या मदतनिसांच्या मानधनाचा प्रश्न अद्याप निकाली लागला नाही. शिवाय इंधन व भाजीपाल्याची रक्कमही अनेकांना मिळाली नाही. त्यामुळे मदतनिसांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असून जिल्हाभरातील मदतनिसांच्या मानधनाचा प्रश्न कायम आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. योजना प्रभावीपणे राबविण्याच्या शासनाच्या सूचना आहेत, शिवाय या योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. परंतु मागील काही वर्षांपासून ही महत्त्वपूर्ण योजना प्रभावीपणे राबविली जात नसल्याचे दिसून येत आहे. कधी तांदळाचा तर कधी धान्यादी मालाचा तुटवड्यामुळे शाळकरी मुलांना पोषण आहार मिळत नाही. विशेष म्हणजे स्वयंपाकी मदतनिसांना तर वेळेत मानधन कधीच वितरित केले जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातच योजना बारगळल्याचे चित्र आहे. मागील वर्षभरापासून जवळपास १८०० मदतनिसांना एक हजार रूपयांप्रमाणे दिले जाणारे मानधन तसेच इंधन व भाजीपाल्याची रक्कमही अद्याप बँकेत जमा नाही, असे मदतनिसांतून सांगितले जात आहे. त्यामुळे तुटपुंज्या मानधनावर काम करणाºया मदतनिसांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलन करूनसुद्धा मानधन वाटपाचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नाही. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारीही याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यात संबंधित विभागातील कर्मचारी मदतनिसांच्या मानधनाबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे मानधन न मिळण्याचे कारण अजूनही असपष्टच आहे.जिल्हा परिषदेच्या १ हजार शाळांमधून दीड लाखाच्या वर पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. सकस आहारापासून विद्यार्थी वंचित राहू नये, याची शासनाकडून खबरदारी घेतली जात असली तरी शापोआ यंत्रणेचा ढिसाळ कारभारच कारणीभूत असल्याचे स्वयंपाकी, मदतनीसांच्या संघटेनेतर्फेसांगण्यात आले. त्यामुळे शिक्षणाधिकाºयांनी तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असून मानधन लवकर बँकेत जमा करण्याची मागणी केली जात आहे. जिल्ह्यातील हजारो स्वयंपाकी मदतनिसांचे मानधन रखडलेले आहे.मदतनीसांचे मानधन बँॅकेत जमा करण्याची प्रक्रिया सुरूच आहे किंवा निधी अप्राप्त आहे, असे सोयीस्कर उत्तर शिक्षण खात्यातील संबंधित विभागाकडून ऐकावयास मिळते.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद