शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST

मोटार वाहन अधिनियम- १९८८ च्या कलम १२९ मध्ये नमूद केल्यानुसार कोणतेही दोनचाकी वाहन रस्त्यावर चालविताना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे ...

मोटार वाहन अधिनियम- १९८८ च्या कलम १२९ मध्ये नमूद केल्यानुसार कोणतेही दोनचाकी वाहन रस्त्यावर चालविताना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे आहे. तसेच वेळोवेळी उच्च न्यायालय, मा. सर्वोच्च न्यायालय यांनीदेखील दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट घालणे हे सक्तीचे असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, नगरपालिका, नगर परिषद व सर्व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी जे दुचाकी वाहनाचा वापर करतात त्यांना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे केले आहे. दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट घातलेले नसल्यास तो अधिकारी व कर्मचारी हा मोटार वाहन अधिनियमाच्या तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद केले आहे. हिंगोली शहर व जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, नगरपालिका, नगर परिषद व सर्व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे आदेश १ फेब्रुवारी २०२१ पासून लागू करण्यात आले आहेत.