शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कळमनुरीत बीडीओंच्या विरोधात ग्रामसेवकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:54 IST

येथील गटविकास अधिकारी ग्रामसेवकांना मानसिक व आर्थिक त्रास देत आहेत. त्यामुळे ग्रामसेवकांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. त्यामुळे बीडीओंची विभागीय चौकशी करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने २८ मे रोजी पं.स. कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : येथील गटविकास अधिकारी ग्रामसेवकांना मानसिक व आर्थिक त्रास देत आहेत. त्यामुळे ग्रामसेवकांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. त्यामुळे बीडीओंची विभागीय चौकशी करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने २८ मे रोजी पं.स. कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले.या धरणे आंदोलनाला जिल्हा परिषद कर्मचारी संघटना विस्तार अधिकारी संघटनेने पाठिंबा दिला. मागणी मान्य न झाल्यास उद्या २९ मे पासून ग्रामसेवक संघटना अहसकार आंदोलन पुकारणार आहे. बैठकांवरही बहिष्कार टाकण्यात येणार आहे. गटविकास अधिकारी सिंचन विहिरीची प्रशासकीय मान्यता परस्पर लाभार्थ्यांना देतात. ग्रामपंचायतीलाही बाब कळविल्या जात नाही. सिंचन विहिरीची मान्यता, अनुक्रमांकानुसार दिल्या जात नाही, गटविकास अधिकारी कार्यालयीन वेळेत दौरे दाखवितात. शौचालयांचा निधी पं.स.ला येवूनही ग्रा.पं.पर्यंत लाभार्थ्यांना देण्यात आला नाही. रोहयो कामाच्या प्रकरणात ग्रामसेवक पाईकराव यांना जवाबदार धरण्यात आले. मग्रारोहयोमध्ये नमुना क्र. ४ पं.स. ला सादर केल्यांतरही दोन-दोन महिने मस्टर निघत नाही. बैठकांना सकाळी ८ वाजताच बोलावतात. सेवा पुस्तिकेत लाल शाईने लिहिण्याची धमकी देतात, संचिका परिपूर्ण असून स्वाक्षरीसाठी मानसिक त्रास देतात. अपमानास्पद बोलतात आदी कारणावरून आदी कारणे दिली. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष शेख शैनोद्दीन, मठपती, लक्ष्मी केंद्रे, शिवाजी गवळी, आर.बी. घुगे, बिनगे, तांबडे, रमेश मोरे, मारोती काशिदे, दीपक काशिदे, शेख समीर आदी उपस्थित होते. तर संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पांढरे, सचिव राजेश किलचे यांनी भेट दिली. ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी दिवसभर धरणे देत होते.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदMorchaमोर्चा