शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांनी टाकला ग्रामसभेवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:17 IST

शासकीय योजनांची जनजागृती करणे, लोकांना ग्रामपंचायतीच्या अधिकारांची माहिती व्हावी यासह विविध विकासात्मक कामाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने वर्षातून निदान ४ तरी ग्रामसभा घेणे बंधनकारक केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासकीय योजनांची जनजागृती करणे, लोकांना ग्रामपंचायतीच्या अधिकारांची माहिती व्हावी यासह विविध विकासात्मक कामाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने वर्षातून निदान ४ तरी ग्रामसभा घेणे बंधनकारक केले आहे. मात्र हिंगोली जिल्ह्यात २६ जानेवारी रोजी ग्रामसेवकांच्या बहिष्कारामुळे एकाही ग्रामपंचायतीत ग्रामसभाच झाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.ग्रा. पं. ची सर्वच कामे कागदोपत्री चालत असल्याचा प्रकार हा काही नविन नाही. त्यातच कोणत्या समितीचा कोणता अध्यक्ष हेदेखील ग्रामस्थांना माहित नसते, निदान २६ जानेवारी, १५ आॅगस्ट आणि १ मे रोजी तरी त्यांची ओळख होऊन ग्रा. पं. करीत असलेल्या कामाची उजळण होऊ शकते. आता तर ग्रामसेवक संघटनेच्या या बहिष्काराने त्या उजळणीलाही पूर्णविराम बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जे पहाव ते नवलच असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. कधी नव्हे, ते आता ग्रामस्थांनाही शासकीय अधिकाºयांनी टाकलेल्या बहिष्काराचा अनुभव २६ जानेवारी रोजी आला आहे. ग्रामसभा होणार नाही, याची जराही ग्रामस्थांना कल्पना नसल्याने अनेक ग्रामस्थ नेहमीप्रमाणे ध्वजारोहण झाल्यानंतर ग्रामसभेसाठी मनात अनेक प्रश्न घेऊन आले होते. परंतु ग्रा.पं मध्ये ग्रामसभेची जराही तयारी दिसून न आल्यामुळे एकच खळबळ उडाली. मोजकेच ठराव ग्रामपंचायतीत तर ग्रामसभेच्या व्यतिरिक्तच अनेक ठराव घेतले जातात.प्रत्येक गावामध्ये अनेक प्रश्न असतात त्याचबरोबर दरवर्षी नव- नवीन योजनाही राबविल्या जातात। परंतु या बहिष्कारामुळे आता त्या योजनांचीही जनजागृही थांबणार हे मात्र खरे! तसे ग्रामस्थांना योजनाची माहितीही ग्रामसभेतूनच होत असते. आता तर त्यावरही संक्रात येण्याची वेळ आली आहे.माहिती नाही : ग्रामसेवकावर सर्वाधिक भारग्रामसेवकावर गावातील कामासह सरकारी कामाचा सर्वाधिक भार असतो. तसेच ग्रामसेवकामुळेच गावातील अडी अडचणी शासन दरबारी जावू शकतात. पंरतु आता जर त्यांनीच बहिष्कार टाकला तर शसनापर्यंत गावातील अडीअडचणी पोहोचवणार तरी कोण? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.जर एखाद्या ग्रामंपचायती मध्ये ग्रामसभा झाली नसल्यास त्याची चौकशी करुन योग्य ती कारवाई करणार असल्याचे नितीन दाताळ (पंचायत विभाग) यांनी सांगितले.ग्रामसभेवर बहिष्कारासह विविध मागण्याचे पत्र प्रशासनास दिले आहे. तसेच या महत्त्वाच्या ग्रामसभेत ग्रामस्थ योग्य ठराव घेण्याएवजी गोंधळच जास्त करतात, तसेच ग्रा.पं.ची कागदपत्रे फाडणे, ग्रामसेवकांवर धावून जाणे आदी प्रकार करतात. त्यामुळे पोलीस संरक्षण दिल्यास ग्रामसभा यशस्वी होऊन शासनाचा उद्देश सफल होईल, असे जिल्हाध्यक्ष दिलीप पांढरे यांनी सांगितले.