शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
4
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
5
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
6
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
7
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
8
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
9
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
10
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
11
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
12
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
13
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
14
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
15
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
16
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
17
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
18
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
19
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
20
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!

काय सांगता ! उमेदवारांनी मिळालेले चिन्ह सोडून केला भलत्याच चिन्हाचा प्रचार; मतदानावेळी उडाला गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 18:23 IST

gram panchayat election उमेदवारांनी चिन्ह कोणते मिळाले याची खात्री न करता जे चिन्ह मागितले होते, त्याचाच प्रचार केला.

ठळक मुद्देप्रचार केला एका चिन्हाचा, मतदानयंत्रावर आले दुसरेच चिन्ह उमेदवारांनी मतदान केंद्रावर गोंधळ केल्याने मतदान थांबले 

वसमत : तालुक्यातील लोण बु. येथे मतदान प्रारंभ होताच उमेदवारांनी मतदान यंत्रावर भलतेच चिन्ह असल्याचा आक्षेप घेतल्याने गोंधळ सुरू झाला. त्यामुळे वार्ड क्र. १ चे मतदान थांबले होते. तहसीलदार व अधिकाऱ्यांनी भेट देवून संभ्रम दूर केला व दुपारनंतर मतदान सुरळीत झाले. उमेदवारांना मिळालेल्या चिन्हाऐवजी भलत्याच चिन्हांचा प्रचार उमेदवारांनी केल्याचा प्रकार यावेळी पहावयास मिळाला.

चिन्ह वाटपाच्या वेळी लोण बु. येथील वार्ड क्र १ मधील उमेदवारांनी चिन्हांचे प्राधान्यक्रम दिले होते. यात एकाने पतंग तर दुसऱ्याने उगवता सूर्य मागितला होता. मात्र हे दोन्ही चिन्हे अयोगाच्या यादीत नसल्याने उमेदवारांना निवडणूक निर्णय अधीकाऱ्यांनी ती नाकारली. पतंगाऐवजी गॅस सिलेंडर तर उगवता सूर्यऐवजी सूर्यफुल हे चिन्ह प्रदान केले. मात्र उमेदवारांनी चिन्ह कोणते मिळाले याची खात्री न करता जे चिन्ह मागितले होते, त्याचाच प्रचार केला. आज मतदान सुरू झाले व उमेदवारांनी पाहिले तर मशीनवर प्रचार केलेले चिन्हच नव्हते. त्यामुळे गोंधळ झाला. आपले चिन्ह बदलून आल्याचा आक्षेप घेत या उमेदवारांनी मतदान थांबवले. 

तहसीलदारांनी दाखवला चिन्ह मागणी अर्जयानंतर लोण येथे तहसीलदार अरविंद बोळंगे, नायब तलसीलदार सचिन जैस्वाल, पळसकर, डीवायएसपी हाश्मी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि विलास चवळी व अधिकाऱ्यांनी भेट दिली. तहसीलदारांनी उमेदवारांनी चिन्ह मागणी केलेला अर्ज व प्रदान केलेले चिन्ह दाखवले व कोणाची चूक आहे. हे दर्शवले व आता मतदान सुरू करू, असे आवाहन केले. उमेदवार व समर्थकांनी काही वेळ वाद घातला, मात्र चूक समजल्याने मतदान सुरू झाल्याचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी सांगितले.

दुपारनंतर सर्व मतदान सुरळीतसपोनि विलास चवळी यांच्याशी संपर्क साधला असता वाद व गोंधळ झाला नव्हता फक्त खात्री न केल्याने संभ्रम झाला होता. तो दुर झाल्याचे सांगितले. फक्त वार्ड क्र १ मध्येच मतदार थांबले होते. अन्य दोन वार्डात मतदान सुरळीत होते. दुपारनंतर सर्व मतदान सुरळीत झाले असल्याचे सपोनि चवळी यांनी सांगितले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतHingoliहिंगोलीVotingमतदान