शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Voting : यादीत दोन वेळा नाव असल्याचा घेतला गैरफायदा; बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 18:30 IST

Gram Panchayat Voting मी मतदानच केले नाही, माझ्या नावावर कोणीतरी मतदान केले ' असा दावा त्याने केला

आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : एकाच मतदार यादीत दोन वेळा नाव असल्याचा फायदा घेत दुसऱ्यांदा मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदारावर आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश संजय बोंढारे असे गुन्हा दाखल झालेल्या मतदाराचे नाव आहे. या प्रकरणामुळे बोगस मतदान व सदोष मतदार याद्यासह वेगळ्याच प्रश्नांना वाचा फुटली आहे. 

याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जानेवारी रोजी ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. येथील जिल्हा परिषद कन्या शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 3/4 -अ मध्ये नागेश संजय बोंढारे हा मतदार दुसऱ्यांदा मतदान करण्यासाठी आल्याचे उपस्थित प्रतिनिधीला लक्षात आले. प्रतिनिधींनी ही बाब केंद्र अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्या मतदाराने मतदान यादीतील क्र. 1720 यावर सुरुवातीला मतदान केले होते. परंतु, तो मतदार यादीतील क्र. 978 या नावावर पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे स्पष्ट झाले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने मतदान केंद्रावर काही काळ गोंधळ झाला. यानंतर रात्री उशिरा मतदान केंद्र अधिकारी देवानंद रमेशराव पंडित यांच्या फिर्यादीवरून नागेश संजय बोंढारे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 171 (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संजय मार्के करीत आहेत. 

माझ्या नावे बोगस मतदान झाले सदर गुन्हा मतदान प्रक्रिया संपल्यानंतर रात्री उशिरा मध्यरात्री दाखल झाला आहे. एकाच मतदार यादीत दोन वेळा नाव कसे आले? याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे .तर सदर व्यक्तींवर मतदान करताना आक्षेप नोंदवला असता ' मी मतदानच केले नाही, माझ्या नावावर कोणीतरी मतदान केले ' असा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे शांततेत पार पडलेल्या या मतदान प्रक्रियेत बोगस मतदान झाले की काय? याबाबतही उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहेत.

टॅग्स :Hingoliहिंगोलीgram panchayatग्राम पंचायतVotingमतदान