शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

जवळा बाजारसह परिसरातील ग्रा.पं. निवडणूक हाेणार चुरशीच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:22 IST

जवळा बाजार सर्कलमधील केवळ तपोवन एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची सर्वत्र धामधूम जाेरात सुरू आहे. प्रत्येक ...

जवळा बाजार सर्कलमधील केवळ तपोवन एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची सर्वत्र धामधूम जाेरात सुरू आहे. प्रत्येक गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचार व राजकीय समीकरणाची जुळवाजुळव करून लढत अटीतटीच्या हाेण्याची शक्यता आहे. विशेषत: जवळा बाजार येथे दोन पॅनलमध्ये चुरशीची लढत हाेणार असून काही अपक्ष निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. यामुळे येथील लढत चांगलीच रंगतदार हाेणार आहे. याशिवाय असोलातर्फे औंढा येथे दोन गटातील चुरस निर्माण झाली आहे. परिसरातील रांजाळा येथील निवडणुकीत दोन गटांमध्ये मोठी चुरस आहे. तसेच राजकीय नेत्याचे गाव असलेल्या आजरसोंडा गावातही दोन पॅनलमध्ये चुरशीच्या लढती हाेणार असल्याने अनेक नेते आपली प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. तसेच नालेगाव, पोटा शेळके, शिरला, पुरजळ गावांतही निवडणूक चुरशीची हाेणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीची मोठी धामधूम सुरू आहे. सध्या उमेदवार दारोदार फिरून मतदारांशी संपर्क करीत आहेत. त्यामुळे या परिसरात होणाऱ्या ग्रामपंचायतच्या लढतीमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.