शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

गुडबाय फेब्रुवारी २०२०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:29 IST

सीएए विरोधात हिंगोलीत जेलभरो आंदोलन सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्यांविरोधात हिंगोलीत मुस्लीम बांधवांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. २ फेब्रुवारी ...

सीएए विरोधात हिंगोलीत जेलभरो आंदोलन

सीएए, एनआरसी, एनपीआर कायद्यांविरोधात हिंगोलीत मुस्लीम बांधवांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.

२ फेब्रुवारी

ग्राम बालविकास केंद्रात ११६ कुपोषित बालके

जिल्ह्यात अंगणावाडीत करण्यात आलेल्या तपासणीनंतर आढळून आलेली कुपोषित ११६ बालके औषधोपचार व योग्य पोषण आहार दिल्याशिवाय यातून बाहेर निघणार नसल्याचे समोर आले होते. यासाठी ग्राम बालविकास केंद्राची स्थापन करून ११६ मुले यात दाखल केली.

३ फेब्रुवारी

आमदार व नगराध्यक्षांत कामावरून जुंपली

नगरपालिकेच्या वतीने शहरात रस्ते व भूमिगत गटार योजना काम सुरू केल्याचा देखावा उभा केला. यामध्ये भ्रष्टाचाराची बजबजपुरी झाली. जळगावप्रमाणे येथील मंडळींना परिणाम भोगावी लागतील, असा इशारा शिवसेना आ. संतोषा बांगर यांनी दिला.

४ फेब्रुवारी

जिल्हा परिषदेत गोंधळ, सभा तहकूब

जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले यांच्या अध्यक्षतेखाली विषय समित्यांचे गट पाडणे, उपाध्यक्ष व सभापतींना विषय समित्यांचा प्रभार सोपविणे यासाठी सभा बोलविली. पद वाटपाच्या नियोजनावरून यावेळी गोंधळ उडाला. त्यामुळे अध्यक्षांनी सभा तहकूब केल्याचे जाहीर केले.

५ फेब्रुवारी

१२ वर्षांपासून गुंगारा देणारे तीन आरोपी जेरबंद

१२ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरार तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळत जेरबंद केले.

६ फेब्रुवारी

त्या तिघांच्या अपात्रतेचा प्रस्ताव

जिल्हा परिषदेत रोज नव्या वादांना तोंड फुटू लागले. विषय समित्यांचे खाते वाटप करण्याच्या सभेत झालेल्या गोंधळानंतर काँग्रेसच्या वतीने माजी आ. भाऊराव पाटील, गोरेगाव गटाच्या तीन सदस्यांचे अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हा कचेरीत दाखल केला.

७ फेब्रुवारी

मंडळाधिकाऱ्यांना तहसीलदारांकडून नोटीस

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने वाॅर्ड आरक्षणासाठी बाेलाविलेल्या ग्रामसभेत गोंधळानंतर सभा तहकूब केल्याचा बनाव केला. वाॅर्ड आरक्षण सोडण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने कार्य केल्याबद्दल ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत कळमनुरीच्या तहसीलदारांनी मंडळाधिकाऱ्यांना नोटीस बजाविली. एवढेच नाहीतर खुलासा करण्याचे सूचित केले.

८ फेब्रुवारी

हिंगोली जिल्ह्यात अफूची शेती

जिल्ह्यातील भाेसी शिवारात अफूच्या शेतीवर आखाडा बाळापूर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी जवळपास दीड हजार झाडे जप्त करण्यात आली.

१९५ अतिक्रमणधारकांना तहसीलची नोटीस

जलेश्वर तलावाच्या पाळूवर व बुडीत क्षेत्रावर अतिक्रमण करणाऱ्या १९५ जणांना तहसील प्रशासनाकडून नोटीस बजाविण्यात आली. यावेळी नगर परिषदेच्या अभियंत्यांनी पाहणी केली.

९ फेब्रुवारी

चिखलीत आग लागून १० लाखांचे नुकसान

जिल्ह्यातील चिखली येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत नवनाथ मारोतराव काळे यांचे घर जळून खाक झाले. यात संसारोपयोगी साहित्य व १ लाख ३५ हजार रुपयांची रोकड जळाली.

१० फेब्रुवारी

स्थगितीत अडली १८ कोटींची कामे

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जुन्या सरकारच्या काळातील विविध कामे व निर्णयांना स्थगिती दिली. शहरातील अंतर्गत रस्त्याचे १८ कोटींची कामे अडकून बसली.

११ फेब्रुवारी

काळ्या मातीवरील बेड फोडले

जिल्ह्यातील उगम फाटा ते आसेगावपर्यंत ॲन्युटीमधून होत असलेल्या राज्य महामार्गावर कुरुंदा येथील पुलाचा पाया बेड टाकून भरला. याचा संशय नागरिकांना आला. यानंतर हे बेड फोडण्यात आले.

१२ फेब्रुवारी

किरकोळ वादातून पतीने पत्नीला पेटवून दिले

घरातील किरकोळ वादातून पतीनेच पत्नीला पेटवून दिल्याची घटना हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथे घडली.

१३ फेब्रुवारी

१६ वर्षांपासून कापूस खरेदी बंद

कळमनुरी येथील कृषी उत्पन्न बाजर समितीत मागील १६ वर्षांपासून जिनिंग-प्रेसिंग नाही. त्यामुळे कापूस खरेदी बंद होती.

१४ फेब्रुवारी

पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या

जिल्ह्यातील इसापूर रमना येथील रहिवासी व मुंबई पोलीस दलातील कार्यरत शिपाई केशव बाभनाजी वानखेडे यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

१५ फेब्रुवारी

अपघातात हिंगोलीचे दोन ठार

अंत्यविधीसाठी जाणाऱ्या वाहनाला अपघात होऊन दोन जण ठार, तर दोघे जण गंभीर झाल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील मोझरीजवळ घडली.

१६ फेब्रुवारी

विवाहितेला ब्लॅकमेल करणारे तिघे जण जेरबंद

सेनगाव तालुक्यातील एका विवाहितेने चिठ्ठी लिहून आत्महत्या करीत तिघांनी बलात्कार केल्याचा आरोप केला. यावरून तिघांना जेरबंद करण्यात आले.

१७ फेब्रुवारी

जुगार अड्ड्यावर धाड, ३१ जणांवर गुन्हा

वसमत तालुक्यातील कडबी मंडईतील बारच्या वरच्या मजल्यावर जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी सात लाख रुपयांचा ऐवज जप्त करून ३१ जणांवर कारवाई करण्यात आली.

१८ फेब्रुवारी

होमगार्डचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

राज्यातील होमगार्डच्या विविध अडचणी व समस्या सोडवाव्यात यासाठी जिल्हाभरातील होमगार्डसनी जिल्हा कार्यालयावर मोर्चा काढला.

१९ फेब्रुवारी

शेतकरी महिलेची आत्महत्या

वसमत तालुक्यातील बाभळगाव येथील अल्पभूधारक महिला शेतकरी द्रौपदाबाई गोपीनाथ मगर यांनी नापिकी व आर्थिक विंवचनेतून आत्महत्या केली.

२० फेब्रुवारी

भव्य मिरवणुकीचे वेधले लक्ष

शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीचा कार्यक्रम थाटामाटात साजरा केला. यानिमित्ताने शहरात विविध कामांची रेलचेल होती. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमले.

२१ फेब्रुवारी

पुन्हा पकडला थर्माकोल साठा

नगर परिषदेमार्फत थर्माकोल अविघटनशील वस्तूची साठवणूक करणाऱ्यांवर विविध ठिकाणी धाड टाकून सिंगल यूज प्लास्टिक वस्तू जप्त केल्या. ही कारवाई न.प.तर्फे करण्यात आली.

२२ फेब्रुवारी

वाळूचे दोन टिप्पर पकडले

वसमत तालुक्यातील वाळूमाफीयांविरोधात पोलिसांनी मोहीम उघडत वाळूचे दोन टिप्पर पकडून चौघांवर गुन्हा दाखल केला.

२३ फेब्रुवारी

पोलिसांची निवासस्थाने प्रशासकीय मान्यतेत

जिल्हा पोलीस दलाच्या जिल्ह्याच्या विविध ठिकाणी ठाणे इमारती, कर्मचारी निवासस्थाने, विश्रामगृह आदी १४ कामे प्रस्तावित करण्यात आली; परंतु जनतेच्या सुरक्षतेकडे लक्ष देणाऱ्या पोलिसांना असुरक्षित निवाऱ्यातच गुजराण करावी लागत आहे.

२४ फेब्रुवारी

देव पावल्याचे सांगत फसवणूक

कोणतीही ओळख-पाळख नसताना धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली ५ हजार ४०० रुपयांची किराणा साहित्य, १५ हजार रुपयांचे रोख घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार चोंडीआंबा येथे घडला.

२५ फेब्रुवारी

अडीच तासांत साडेतीन लाख रुपये वसूल

थकीत वीज बिल वसुली पूर्ण करण्यासाठी आखाडा बाळापूरमध्ये महावितरणच्या पथकाने कारवाई केली. २० ते २५ कर्मचाऱ्यांचे पथक दारावर धडकले. त्यांनी अडीच तासांमध्ये साडेतीन लाख रुपये वसूल केले.

२६ फेब्रुवारी

भाजपच्या वतीने जिल्हाभरात धरणे आंदोलन

राज्य शासनाच्या धोरणाविरोधात तालुका भाजपच्या वतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात आले.

२७ फेब्रुवारी

तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना विचारली जाते जात

बाजारापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांनी नाफेडच्या केंद्रावर गर्दी करीत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

२८ फेब्रुवारी

डॉक्टर पत्नीची पतीविरोधात चोरीची तक्रार

वसमत येथील डॉक्टर मनीषा तम्मेवार यांनी घरी चोरी झाल्याची तक्रार दिली असून, तक्रारीत आरोपी म्हणून चक्क डॉक्टर पती व अन्य एकाचे नाव घेतले आहे.

२९ फेब्रुवारी

दोन दुकाने फोडून ३५ मोबाइल लंपास

शहरातील जवाहर रोडवरील दोन मोबाइल दुकाने फोडून त्यातून जवळपास ३५ मोबाइल लंपास केले. दुसऱ्या दिवशी मात्र चोरट्यांना दुकानात काहीच हाती लागले नाही.