शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीला मारहाण केल्याने भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:22 IST

मैत्रिणीला मारहाण का केली म्हणून भावकीतीलच एका युवकाचा खून केल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यातील आसोला येथील नवीन वसाहतीत गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.

जवळा बाजार : मैत्रिणीला मारहाण का केली म्हणून भावकीतीलच एका युवकाचा खून केल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यातील आसोला येथील नवीन वसाहतीत गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.आसोला येथील किशोर ग्यानोजी कीर्तने (२६) हा जवळा बाजार येथे मजुरीने कामासाठी जातो. तेथे समना आदमाने नावाच्या एका मुलीशी त्याची मैत्रीही होती. ती २४ जानेवारी रोजी आसोला येथे आली होती. किशोर हा जवळ्यात येवून मारहाण करतो, त्याला समजावून सांग असे तिने किशोरची पत्नी सुजाताला सांगितले. तू त्याची मैत्रिण आहेस, मी काय सांगणार, असे म्हणून बराच वेळ सुजाताशी गप्पा झाल्या. सपना रात्रभर किशोरच्याच घरी झोपली. दुसºया दिवशी किशोर जवळयात मजुरीला गेला. तेव्हा जयशीला प्रभाकर कीर्तने यांनी किशोरची आई कमलबाई, सुजाता, सपना यांना घरी जेवायला येण्याचे निमंत्रण दिले. ११ वाजता जेवण करून ते परतले. सुजाता पाणी आणण्यासाठी गेली असता जयशीला कीर्तने यांच्या घराकडे भांडणाचा आवाज येत होता. तेथे किशोर कीर्तने हा जखमी असून त्याच्या पोटातील आतडे बाहेर आल्याचे कमलाबार्इंना दिसून आले. गणेश प्रभाकर कीर्तने याने तू सपना हिस का मारहाण करतो म्हणून म्हणून किशोरच्या पोटात चाकू खुपसल्याचे सुजाता हिने सांगितल्याचे कमलाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. जखमी किशोरला जवळा बाजार येथे रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत कमलाबाई कीर्तने यांच्या तक्रारीवरून हट्टा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मयतास एक दोन वर्षांचा मुलगाही आहे.