शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सेनगावात रेशन कार्ड मिळणे झाले दुर्लभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST

सेनगाव: येथील तहसील कार्यालयात मागील वर्षभरापासून नवीन रेशन कार्ड मिळत नसल्याने लाभार्थी त्रस्त झाले असून, अनेकांना रेशन कार्ड नसल्याने ...

सेनगाव: येथील तहसील कार्यालयात मागील वर्षभरापासून नवीन रेशन कार्ड मिळत नसल्याने लाभार्थी त्रस्त झाले असून, अनेकांना रेशन कार्ड नसल्याने शासनाच्या आरोग्य उपचार सुविधांसह अन्य योजनांचा लाभ घेताना अडचण निर्माण होत आहेत.

तालुक्यात रेशन कार्ड वाटपातील अनियमितता अनेक वर्षांपासून कायम आहे. सद्य:स्थितीला तहसीलचा पुरवठा विभागात नवीन रेशन कार्ड पाहायला मिळत नसताना बाहेरून आलेल्या नवीन रेशन कार्डला नोंदणीकृत करण्याचे सोपे काम करून, लाभार्थ्यांची वेळ मारून नेत आहे. पूर्वी येथील तहसील कार्यालयाला प्राप्त नवीन रेशन कार्डचे वाटप नियमानुसार, गरजवंत किंवा गहाळ झालेल्या लाभार्थ्यांना नवीन कार्ड वाटप केले नाही. त्यामुळे आजमितीस रेशन कार्डधारक कुटुंबासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. तहसील कार्यालयात रेशन कार्ड गहाळ झालेले किंवा विभक्त कुटुंब झालेले अनेक लाभार्थी नवीन रेशन कार्ड बनविण्यासाठी रीतसर मागणी अर्ज देऊन नियमानुसार शुल्क भरणा करायला तयार आहेत, परंतु तहसीलच्या पुरवठा विभागात चकरा मारूनही ते मिळत नाही.

अनेक गोरगरीब कुटुंबातील सदस्यांना रेशन कार्ड नसल्याने शासनाच्या मोफत आरोग्य उपचार सुविधांचा लाभ मिळत नाही. असे असताना तहसील कार्यालय, पुरवठा विभाग याबद्दल बेफिकीर आहे. मागील वर्षभरापासून नवीन रेशन कार्ड नाही. पुरवठा विभागाने पंडित दिनदयाळ योजनेचा माध्यमातून नवीन ४ हजार ५०० रेशन कार्डची मागणी गतवर्षी जानेवारीमध्ये केली असल्याचे सांगितले जात आहे.

तालुक्यात नवीन रेशन कार्डची मागणी होऊ लागली आहे. पूर्वी झालेल्या नवीन रेशन कार्डचे तहसील, रास्त भाव दुकानदारांनी व्यवस्थितरीत्या वाटप केले नाही. यापूर्वी तहसीलला प्राप्त नवीन रेशन कार्ड कुणाला वाटप झाले, किती रास्त भाव दुकानदारानी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविले, याची तपासणी करण्याची गरज आहे. नवीन रेशन कार्डबद्दल निर्णय घेऊन मागणी करणाऱ्यांना विनाअडथळा रेशन कार्ड वाटप करण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया

आमच्याकडे रेशन कार्ड नाहीत

येथील पुरवठा विभागातील अव्वल कारकून कारघुडे यांनी नवीन रेशन कार्ड वर्षभरापासून नसल्याचे सांगितले. आम्ही साडेचार हजार नवीन रेशन कार्ड मागणी केली आहे. आमच्याकडे आता एकही नवीन रेशन कार्ड नसल्याने, आम्ही नवीन रेशन कार्ड मागणी असूनही देऊ शकत नसल्याचे सांगितले.