शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगार तरुणांना फसविणाऱ्या टोळीचा सूत्रधार आंध्रप्रदेशातून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 18:04 IST

देशभरातील हजारो युवकांकडून कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या  रॅकेटचा वसमत पोलिसांकडून तपास 

ठळक मुद्देवसमत पोलिसांकडून राष्ट्रव्यापी रॅकेटचा तपास

वसमत (जि. हिंगोली) : बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार शैलेशकुमार दुबे (रा. उत्तर प्रदेश) हा वसमत शहर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. यापूर्वी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता गुरुवारी मुख्य सूत्रधारास जेरबंद करीत वसमत पोलिसांनी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात देशभरात हजारो तरुणांकडून कोट्यवधीची फसवणूक या टोळीने केल्याचे चौकशीत समोर येत आहे.

ही टोळी तरुणांना हेरून त्यांना नोकरीचे आमिष दाखवत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायची आणि खोटे नियुक्तीपत्र देऊन फसवणूक करीत असे. या टोळीने वसमत तालुक्यातील पंडित ढवळे या तरुणास रेल्वेमध्ये नोकरी लावतो, असे सांगून १० लाख रुपये लुटले होते. त्यांनी त्याला खोटे ट्रेनिंग आणि खोटे नियुक्तीपत्र दिले होते. या प्रकरणी वसमत पोलीस ठाण्यात १३ मे राेजी गुन्हा नोंदविण्यात आला होता.

कर्नुल येथून घेतले ताब्यातवसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य सूत्रधार फरार होता. मोबाइल लोकेशनच्या आधारे व पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील कर्नुल भागातून मुख्य आरोपी शैलेशकुमार दुबे याला ताब्यात घेतले. आता हा सूत्रधार कोणाच्या जीवावर हा धंदा करीत होता? याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, उपविभागीय पोलीस अधिकारी यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, साहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे आदींनी ही कामगिरी केली. मुख्य आरोपीस अटक करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गजानन बर्गे, ढेंबरे, गोरलावाड, काळे, कातकडे आदींचे पथक गेले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीArrestअटक