वसमत तालुक्यातील चोंडी बहिरोबा येथील संतोष जाधव यांना दामदुप्पट पैसे करून देतो म्हणत ५ लाख रुपये घेतले. यानंतर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून २४ तासांच्या आत मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपी ज्ञानेश्वर जाधव यास अटक केली. उर्वरित तीन जणांच्या शाेधात पोलीस होते. औरंगाबाद येथे पाेलीस जाऊन आले; परंतु आरोपी मिळाले नाहीत. यानंतर सपोनि. सुनील गोपीनवार यांना वसमत तालुक्यातील दारेफळ येथे आरोपी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ९ फेब्रुवारी रोजी ११ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी छापा टाकला. आरोपी त्र्यंबक भालेराव यास अटक करण्यात आली. ही कारवाई सपाेनि. गोपीनवार, जमादार बाबूराव केंद्रे, तुकाराम आमले, बशीर चौधरी, गजानन भोपे यांनी केली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता, दाेन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
दामदुप्पट प्रकरणातील दुसरा आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:31 IST