शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जनसुविधातील ४५ गावांना निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:14 IST

जिल्ह्यातील ५0 गावांना ग्रामपंचायतींना जनसुविधासाठी विशेष अनुदान या योजनेत पालकमंत्र्यांच्या आदेशाने प्रत्येकी ५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यातील ४५ गावांचे पत्र पंचायत समित्यांना मुख्य कार्यकारी अधिका-यांनी पाठविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील ५0 गावांना ग्रामपंचायतींना जनसुविधासाठी विशेष अनुदान या योजनेत पालकमंत्र्यांच्या आदेशाने प्रत्येकी ५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यातील ४५ गावांचे पत्र पंचायत समित्यांना मुख्य कार्यकारी अधिका-यांनी पाठविले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून जनसुविधा योजनेतील गावांच्या निवडीची चर्चा होत होती. गेल्या वर्षी ऐनवेळीपर्यंत ही यादी आली नव्हती. त्यात अनेकांच्या गावांची नावे न आल्याने जि.प.सदस्यांत नाराजी होती. यंदा तर ५0 गावेच निवडायची होती. ४५ गावांच्या निधी मंजुरीच्या आदेशाचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी पंचायत समित्यांना पाठविले आहे. हिंगोली तालुक्यातील सावा, साटंबा, बोडखी, आमगव्हाण-आंबाळा, इसापूर, बोराळा, हिवरा बेल, चिंचाळा, भटसावंगी तांडा, जांभरुण तांडा, भोगाव, चिंचोली, खेर्डा या १३ गावांचा समावेश आहे. वसमत तालुक्यातील सुनेगाव, सावंगी, पांगरा सती, किन्होळा, तुळजापूरवाडी, पळसगाव, सेलू या सात गावांचा समावेश आहे. कळमनुरी तालुक्यातील सांडस, गौळ बाजार, देवजना, पिंपरी खु., नरवाडी, पावनमारी, येगाव या सात गावांचा समावेश आहे. सेनगाव तालुक्यातील भानखेडा, करेगाव, चिंचखेडा, कापडसिनगी, कहाकर खु., सिनगी खां, हाताळा, वेलतुरा, बटवाडी, खुडज, सोनसावंगी या ११ गावांचा तर औंढा तालुक्यातील ढेगज, येडूद, सावरखेडा, वडद, केळी, असोला त.लाख, निशाना या सात गावांचा समावेश आहे.२0१७-१८ या आर्थिक वर्षासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र गेल्या वर्षीचे दायित्व ६४.४६ लाख रुपये असल्याने हा निधी वजा केल्यास २.३५ कोटी रुपयेच शिल्लक उरत होते. त्यामुळे ५0 ग्रा.पं.ला प्रत्येकी ५ लाख याप्रमाणे २.५0 कोटी लागतात. उर्वरित १४.४६ लाख पुनर्विनियोजनातजिल्हा परिषदेने मागणी केली आहे. तर ५ ग्रामपंचायतीत सध्या निवडणुका सुरू असल्याने त्यांना तूर्त या यादीतून वगळले असून निवडणुकीनंतर निधी प्रदान केला जाणार आहे. त्यामुळे या पाच गावांसाठीचा निधीही नंतरच वर्ग होणार आहे.गतवर्षी जनसुविधा योजनेतील गावांची निवड करताना जि.प.सदस्यांपेक्षा पालकमंत्री व आमदारांनाच प्राधान्य दिल्याचा आरोप करून बोंब झाली होती. यंदा मात्र कोणी ब्रही काढताना दिसत नाही.