शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दाम दुप्पटच्या नावाखाली ५ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:55 IST

शिरडशहापूर : वसमत तालुक्यातील चोंडी बहिरोबा येथ दाम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून एकाची ५ लाख रुपयांना ...

शिरडशहापूर : वसमत तालुक्यातील चोंडी बहिरोबा येथ दाम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून एकाची ५ लाख रुपयांना फसवणूक केल्याची धक्कादायक घटना १ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. याप्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोंडी बहिरोबा येथील संतोष बालाजी जाधव वय ३० हे एका खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांची ओळख सेनगाव तालुक्यातील वरखेडा येथील ज्ञानेश्वर नारायण जाधव यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले. यातून ज्ञानेश्वर जाधव यांनी संतोषला दाम दुप्पट पैसे करून देतो असे पटवून दिले. त्यानंतर दाम दुप्पटचा भूलभुलैया सुरू झाला. ११ जानेवारी रोजी चोंडी बहिरोबा येथे २ लाख रुपये नगदी दिले. उर्वरित ३ लाख रुपये औरंगाबादला देण्याचे ठरले. यानुसार संतोष व त्यांच्या एका मित्राने २९ जानेवारी रोजी ३ लाख रुपये घेऊन गेले. ज्ञानेश्वर यांनी औरंगाबाद येथील जटवाडा रोड या ठिकाणी बोलावून घेतले. त्यावेळी ज्ञानेश्वर व इतर तिघा जणांनी संताेष व त्यांच्या मित्राला थापडबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्याकडील तीन लाख रुपये जबरीने हिसकावून घेत कोणाला सांगितले तर ठार करू अशी धमकी दिली. तेथून पैसे घेऊन पळून गेले. या घटनेनंतर संतोष व त्यांचा मित्र चोंडी बहिरोबा गावाकडे आले. नंतर कुरुंदा पोलीस ठाणे गाठत घटनेची हकीकत कथन केली. त्यांच्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर नारायण जाधव व इतर तीन अनोळखी इसमांविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि सुनील गोपीनाथ, जमादार गजानन तपास करीत आहेत.