शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पाच जणांचे रक्त नमुने प्रयोगशाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:35 IST

औंढा तालुक्यातील वगरवाडी येथे डेंग्यू साथरोगावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय येथील पाच जणांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

ठळक मुद्देहिंगोली : आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औंढा तालुक्यातील वगरवाडी येथे डेंग्यू साथरोगावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. शिवाय येथील पाच जणांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.औंढा तालुक्यात डेंग्यूच्या साथीने डोके वर काढले अन् आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले. शिरड शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वगरवाडी गाव येते. डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले. तिघांचा बळी गेला. हा प्रकार समोर आल्यानंतरच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली व साथरोग नियंत्रणासाठी उपाय-योजना सुरू केल्या, हे विशेष. परंतु वगरवाडी येथील तीन व्यक्तींच्या मृत्यूनंतरही गावात साथच पसरली नाही, असे आरोग्य विभागाकडून ठणकावून सांगितले जात आहे. गावात डेंग्यूची साथ आहे, हे पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या पाच जणांच्या रक्त नमुन्यांवरूनच सिद्ध होणार, असा पवित्रा मात्र आरोग्य विभागाने घेतला आहे. पुणे येथे पाठविलेल्या रक्त नमुन्यांचा अहवाल येणास सहा ते सात दिवस लागणार असल्याचे विभागातर्फे सांगितले. तर गावातील बळी डेंग्यूच्या साथीमुळेच झाला, असे येथील ग्रामस्थांतून सांगितले जात आहे. दुसरीकडे आरोग्य यंत्रणेला तपासणी नमुन्यांची प्रतीक्षा आहे.तपासणी : ...तरच डेंग्यूची साथएकाच आजाराची चार ते पाच किंवा त्यापेक्षा जास्त जणांना लागण झाल्यास साथरोग म्हणता येईल. त्यामुळे गावात डेंग्यूचीच साथ आहे, असे म्हणता येणार नाही. गावात खरेच साथ पसरली आहे का, हे रुग्णांचा रक्त तपासणी अहवाल आल्यावरच समजणार आहे. तसेच खाजगी रुग्णालयातील अहवाल ग्राह्य धरले जात नाहीत. त्यामुळे वगरवाडी येथील पाच जणांचे रक्तजल नमुने पुणे येथे पाठविण्यात आले असून ते अहवाल प्राप्त होताच साथरोग आहे किंवा नाही. हे निष्पन्न होईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी सांगितले.