शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे राज्यातील पहिले जीआयएस उपकेंद्र हिंगोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 19:20 IST

महावितरण कार्यालयाच्या परिसरात एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम (आयपीडीएस) योजनेच्या माध्यमातून महावितरण कंपनीतर्फे राज्यातील पहिल्या जीआयएस प्रकारातील ३३, ११ केव्ही उपकेंद्राची उभारणी करुन कार्यान्वीत करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देया उपकेंद्राचा लाभ हिंगोली शहरातील जवळपास चार हजार वीज ग्राहकांना होणार आहे.

हिंगोली : येथील महावितरण कार्यालयाच्या परिसरात एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम (आयपीडीएस) योजनेच्या माध्यमातून महावितरण कंपनीतर्फे राज्यातील पहिल्या जीआयएस प्रकारातील ३३, ११ केव्ही उपकेंद्राची उभारणी करुन कार्यान्वीत करण्यात आले आहे. 

राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १७ मे २०१७ रोजी या उपकेंद्राचे भूमिपूजन केले होते.  खाकीबाबा मठ उपकेंद्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपकेंद्रातून नवीन आठ ११ केव्ही वीज वाहिन्यांची निर्मिती करण्यात आली आहे.   हिंगोली शहराची विजेची गरज लक्षात घेवून गॅस इन्सुलेटेड प्रणालीचा उपयोग करत (जीआयएस)  खाकीबाबा मठ उपकेंद्राची उभारणी केवळ बाराशे स्क्वेअर मीटर जागेमध्ये करण्यात आली आहे. पायाभूत आराखडा विभागामार्फत ३ कोटी ५ लाख रुपये खर्च करुन औरंगाबाद येथील आयडिया इंजिनिअर्स या कंपनीने या उपकेंद्राची उभारणी केली.

उपकेंद्रासाठी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांचे मार्गदर्शन तर तत्कालीन मुख्य अभियंता अविनाश पाटोळे, प्रभारी मुख्य अभियंता आजिनाथ सोनवणे यांनी केलेला पाठपुराव्यामुळे काम गतीने झाले. तसेच अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, के.एस. रामटेके, अति.कार्यकारी अभियंता कोथळे, सहायक अभियंता पवार, हिंगोली मंडळाचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) एस.एस. चौधरी, कार्यकारी अभियंता आर.जी.लोंढे, अति.कार्यकारी अभियंता जी.टी. महाजन, उपकार्यकारी अभियंता डी.ई. पिसे, सहायक अभियंता वानखेडे, ए.आर.नळे, एन.व्ही. पिन्नेंटी, एस.डी.बेरसाळे, एन.डी. मांडोकार, स्थापत्य विभागाचे उपकार्यकारी अभियंता खंदारे आदींनी परिश्रम घेतले.

अखंडित व योग्य दाबाची वीज...या उपकेंद्राचा लाभ हिंगोली शहरातील जवळपास चार हजार वीज ग्राहकांना होणार आहे. अखंडित व योग्य दाबाचा वीजपुरवठा करण्यास उपकेंद्राची मदत होणार आहे.  लिंबाळा येथील २२० केव्ही  या अतिउच्चदाब विद्युत केंद्राद्वारे खाकीबाबा मठ उपकेंद्रास ३३ केव्ही दाबाचा वीजपुरवठा होणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात वीज पोहोचवण्याचे उद्देशाने केंद्रशासनाच्या ऊर्जा विभागाच्या वतीने शहरी भागातील विद्युतीकरणासाठी अर्थसहाय्य केले जात असून एकात्मिक ऊर्जा विकास योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या वतीने अनेक ठिकाणी नवीन उपकेंद्रे उभारली जात आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजHingoliहिंगोलीState Governmentराज्य सरकार