शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक अडचणी, संशयवृत्तीने शेकडो कुटुंबात कटुता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:37 IST

हिंगोली : कोरोनामुळे अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे व्यवसाय बुडाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या, रोजगार हातचा गेल्याने घरातच थांबावे लागत आहे. यातून ...

हिंगोली : कोरोनामुळे अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे व्यवसाय बुडाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या, रोजगार हातचा गेल्याने घरातच थांबावे लागत आहे. यातून पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होत असून, अशा दीड वर्षात ७४१ तक्रारी भरोसा सेलकडे आल्या आहेत. संशय, आर्थिक कारण, कौटुंबिक त्रास, आदी कारणे यामध्ये नमूद करण्यात आली आहेत.

मागील दीड वर्षापासून कोरोनाने सर्वांना जेरीस आणले आहे. छोटे-मोठ्या व्यावसायिकांसह अनेकांचा रोजगार गेला आहे. हाती पैसा येत नसल्याने मानसिकतेवरही परिणाम होत असून, घरी थांबावे लागत असल्याने वादाला सुरुवात होत आहे. त्यातूनच संशयी वृत्ती बळावणे, छोट्या कारणावरूनही मारहाण करणे, आदी प्रकार पती-पत्नीमध्ये उद्‌भवत आहेत. महिलांच्या छळाचे प्रकार वाढत असून, या तक्रारी थेट पोलीस ठाण्यापर्यंत पर्यायाने न्यायालयापर्यंत जात आहेत. यातून विभक्त होण्याचा टोकाचा निर्णयही घेतला जात आहे. मागील दीड वर्षात येथील भरोसा केंद्राकडे ७४१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. भरोसा केंद्रातील पथक, समुपदेशकामार्फत पती-पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी पुढाकारही घेतला जात आहे.

बॉक्स

२५४ पती-पत्नीमधील भांडण सोडविले

येथील भरोसा सेलकडे महिलांनी तक्रारी केल्यानंतर पती-पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी ठराविक तारखेला समुपदेशनासाठी बोलाविले जाते. २०२० मध्ये ५१० तक्रारी आल्या होत्या. यातील १६१ तक्रारींचे निराकरण करून पती-पत्नीमधील भांडणे सोडविण्यात भरोसा सेलला यश आले आहे, तर २०२१ मे अखेर २३१ तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ९३ जणांमध्ये भांडणे सोडविण्यात यश आले आहे.

पैसा, संशय हेच कारण

भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी पैशांमुळे वाद होणे तसेच संशयावरून मारहाण करणे, सासू-सासऱ्याचा त्रास, दारूचे व्यसन, मानसिक तणाव, आदी स्वरूपाच्या तक्रारींचा समावेश आहे.

दारूच्या आहारी गेल्याने तक्रार

पती दारूच्या आहारी गेल्याने पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होऊन हे प्रकरण भरोसा सेलकडे आले होते. यावेळी भरोसा सेलमधील समुपदेशकांनी पतीला दारूचे दुष्परिणाम, कुटुंबावर होणारा परिणाम या बाबी समजावून सांगितल्या. दारूचे दुष्परिणाम समजल्याने पती-पत्नीमधील वाद मिटून आता हे जोडपे सुखाने नांदत आहेत.

मानसिक तणावातून मुक्त

येथील भरोसा सेलकडे मानसिकतेतून त्रास होत असल्याचे प्रकरण आले होते. यातूनच पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होत होता. भरोसा सेलच्या पथकाने दोघांनाही समुपदेशनासाठी बोलावून घेत त्यांना मार्गदर्शन केले. तसेच मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दीपक डोणेकर यांनीही समुपदेशन केले. यामुळे दोघातील वाद मिटून आता हे दोघेही चांगले वागत आहेत. त्यांचा संसार सुखाने सुरू आहे.

भरोसा सेलकडे तक्रारी आल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली पती-पत्नीमधील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. कोरोनामुळे तक्रारीचे प्रमाण वाढले असले तरी दीड वर्षात २५४ पती-पत्नीमधील वाद मिटविण्यात भरोसा सेलला यश आले आहे.

-विशाखा धुळे, सहायक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल

भरोसा सेलमध्ये जानेवारी २०२० पासून आलेल्या एकूण तक्रारी- ७४१

जानेवारी २०२१ पासून आलेल्या तक्रारी- २३१