शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
4
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
5
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
6
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
7
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
8
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
9
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
10
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
11
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
12
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
13
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
14
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
15
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
16
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
17
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
18
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
19
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
20
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?

वित्त आयोगाची कामे निधीआधीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:55 IST

आराखड्यातील कामाची आॅनलाईन नोंदणी केल्याशिवाय ग्रामपंचायतींनी वित्त आयोगातील कामे करू नयेत, असा संकेत असतानाही निधी मिळण्यापूर्वीच ही कामे होत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत असल्याची बोंब आहे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आराखड्यातील कामाची आॅनलाईन नोंदणी केल्याशिवाय ग्रामपंचायतींनी वित्त आयोगातील कामे करू नयेत, असा संकेत असतानाही निधी मिळण्यापूर्वीच ही कामे होत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत असल्याची बोंब आहे. यात अनेक प्रकारच्या मान्यता नंतर घेऊन पांघरुण घालण्याचा प्रयत्न होत असून त्यामुळे योग्य कामाची निवड होताना दिसत नाही.शासनाने वित्त आयोगाचा निधी खर्च करताना यावेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये अतिशय काटेकोर नियम घातले आहेत. गावपातळीवर विविध प्रकारच्या समित्यांची स्थापना करून कोणत्या बाबींवर किती निधी खर्च करावा, याचे स्पष्ट मार्गदर्शन या आदेशात दिलेले होते. शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, अपंग कल्याण अशा अनेक बाबींना त्यात हात घातला होता. हे आराखडे तयार करतानाही त्यात सर्वांचाच सहभाग राहील, याची काळजी घेतली. समतोल विकासासाठी शासनाने उचललेल्या पावलांना मात्र हरताळ पुसण्याचेच काम सुरू आहे. अनेक ग्रामपंचायतींनी हे आराखडे गुंडाळून ठेवले होते. निधी येण्यापूर्वीच सरपंच व सदस्यांना वाटेल त्याप्रमाणेच निधी खर्च करून नंतर तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेण्याचे उलटे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत. त्यामुळे गटविकास अधिका-यांकडेही तक्रारी येत असून अनेक ठिकाणी ग्रामसेवक व पदाधिका-यांतही खटके उडताना दिसत आहेत. या प्रकाराला पायबंद घालण्यासाठी पंचायत समित्या अथवा जिल्हा परिषद मात्र शासन नियमांतच अशी प्रक्रिया करू नये, असे सांगितले आहे. तक्रारी आल्यावर आम्ही त्यात लक्ष घालत असल्याचे सांगत आहे.