शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर कर्नाटक राज्यातून पुरातन मूर्ती जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:02 IST

शहरातील श्री शांतीनाथ श्वेतांबर जैन मंदिरातील पंचधातूंची चोवीस तीर्थंकरांची मूर्ती आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे. हिंगोली शहर ठाण्यात २७ फेबु्रवारी रोजी आरोपींना हजर केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील श्री शांतीनाथ श्वेतांबर जैन मंदिरातील पंचधातूंची चोवीस तीर्थंकरांची मूर्ती आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे. हिंगोली शहर ठाण्यात २७ फेबु्रवारी रोजी आरोपींना हजर केले होते. मोठ्या शिताफीने आरोपींचा पाठलाग करून त्यांना अटक केली होती. तसेच आरोपींनी कर्नाटक राज्यातील तुगाव कुटी येथील घराच्या पाठीमागे जमिनीखाली मूर्ती पुरून ठेवली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २ ते ३ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत पुरातन पंचधातूंची मूर्ती चोरीस गेल्याची तक्रार सुरेश पारसमल जैन यांनी हिंगोली शहर ठाण्यात दिली होती. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपींना मोठ्या शिताफीने कामारेड्डी तेलंगणा येथून २१ फेबु्रवारी रोजी अटक केली. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली होती. यात पोलिसांनी आरोपींकडील मूर्ती जप्त केली.पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अशोक मैराळ यांनी तपास पथक तयार केले. पथकात पोउपनि ज्ञानोबा मुलगीर, पोना शेख शकील, सुनील अंभोरे, पोना सुधीर ढेंबरे, पोना जीवन मस्के, शेख मुजीब यांनी तपासाची चक्रे फिरवून सदर गुन्ह्यातील आरोपी शेख हैदर शेख इस्माईल (३०, रा. तुगाव (कुटी), शेख अजिज शेख इमाम हुसेन (२४, रा. ब्याबली तालुका भालकी जि. बिदर राज्य कर्नाटक) आरोपींना कामारेड्डी राज्य तेलंगणा येथून अटक केली. कसून चौकशी केली असता मूर्तीही आरोपी शेख हैदर यांच्याकडून जप्त करण्यात आली.जिल्ह्यात अनेक ठिकाणी मूर्ती व मूर्तीवरील दागिने चोरीस जाण्याचे प्रकार घडत आहेत.