शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आखाडा बाळापूर : एकाच मतदार यादीत दोनवेळा नाव असल्याने एकच व्यक्ती दुसऱ्यांदा मतदान करण्यासाठी गेल्याच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आखाडा बाळापूर : एकाच मतदार यादीत दोनवेळा नाव असल्याने एकच व्यक्ती दुसऱ्यांदा मतदान करण्यासाठी गेल्याच्या आरोपावरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बोगस मतदान व सदोष मतदार याद्यांसह वेगळ्याच प्रश्नांना वाचा फुटली आहे.

आखाडा बाळापूर येथे १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी आखाडा बाळापूर येथील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेतील मतदान केंद्र क्रमांक ३/४ अ मध्ये एकच नागरिक दुसऱ्यांदा बोगस मतदानासाठी मतदान केंद्रात आल्याचे लक्षात आले. मतदान प्रतिनिधींनी ही बाब मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यावेळी मतदार यादीतील मतदान यादी क्रमांक १७२०वर एक वेळा मतदान झाले होते. परंतु, मतदारयादी क्रमांक ९७८ वर सदर व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आला. यावेळी आक्षेप नोंदवून या नागरिकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ही घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. मतदान केंद्रावर यामुळे काही काळ गोंधळ झाला. त्यानंतर प्रकरण शांत झाले. परंतु, रात्री उशिरा मतदान केंद्र अधिकारी देवानंद रमेशराव पंडित यांच्या फिर्यादीवरून नागेश संजय बोंढारे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १७१ (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संजय मार्के करत आहेत. हा गुन्हा मतदान प्रक्रिया संपल्यानंतर उशिरा मध्यरात्री दाखल झाला आहे. एकाच मतदार यादीत दोनवेळा नाव कसे आले? या व्यक्तींवर मतदान करताना आक्षेप नोंदवला असता ‘मी मतदानच केले नाही, माझ्या नावावर कोणीतरी मतदान केले’ असा दावा त्याने केला होता. त्यामुळे शांततेत पार पडलेल्या या मतदान प्रक्रियेत बोगस मतदान झाले की काय? याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.