शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

विरोधकांपेक्षा स्वकियांचीच बसली धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:37 IST

आचारसंहिता लागूनही पितृपक्षामुळे पक्षीय उमेदवाऱ्यांचे भिजत घोंगडे कायम आहे. मतदारसंघ एक अन् इच्छुक अनेक असे चित्र सगळीकडेच आहे. पक्षश्रेष्ठीने प्रत्येकालाच कामाला लागण्याचा सल्ला दिला. मात्र काहीजण मुंबईच्या वा-या करीत असल्याने कामाला लागलेल्या दुस-याचे मन प्रचारात लागत नाही. स्वकीयच घात करतो का? या भीतीने पोखरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आचारसंहिता लागूनही पितृपक्षामुळे पक्षीय उमेदवाऱ्यांचे भिजत घोंगडे कायम आहे. मतदारसंघ एक अन् इच्छुक अनेक असे चित्र सगळीकडेच आहे. पक्षश्रेष्ठीने प्रत्येकालाच कामाला लागण्याचा सल्ला दिला. मात्र काहीजण मुंबईच्या वा-या करीत असल्याने कामाला लागलेल्या दुस-याचे मन प्रचारात लागत नाही. स्वकीयच घात करतो का? या भीतीने पोखरले आहे.हिंगोली जिल्ह्यात कळमनुरीत आ.डॉ.संतोष टारफे व हिंगोलीत आ.तान्हाजी मुटकुळे यांनाच पक्षश्रेष्ठींनी खºया अर्थाने हिरवी झेंडी दाखविल्याचे त्यांच्या एकंदर वागण्यातून दिसत आहे. इतरांकडे तो आत्मविश्वास नाही. वरिष्ठांनीही या सर्व मंडळींना आॅक्सिजनवरच ठेवले आहे. हिंगोलीत काँग्रेसमध्ये माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर हे एकमेव इच्छुक उरल्याचे कालपर्यंत चित्र होते. मात्र दुसºया गटाला कोणी विचारतही नसल्याने त्यांनी पुन्हा दावेदारी मांडली. कुरघोडीचे हे राजकारण या टप्प्यापर्यंत कायम आहे. मात्र काही जणांनी मध्यस्थी करून हे दोन गट एकत्र आणण्याचे शिकस्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात काही प्रमाणात यशही आल्याचे सूत्रांकडून रात्री उशिरा कळाले.कळमनुरीत सेनेचे संतोष बांगर कामाला लागले आहेत. मात्र सेनेत माजी खा.शिवाजी माने यांचा प्रवेश होणार असल्याच्या अफवेने ते हैराण झाले आहेत. दुसरीकडे मतदारसंघ सुटेल की नाही, हे माहिती नसले तरीही भाजपमध्ये माजी खा.माने व माजी आ.गजानन घुगे यांच्यातील चुरसही एकमेकांची बेचैनी वाढवत आहे. वसमतमध्ये विद्यमान आ.जयप्रकाश मुंदडा यांना अजूनही हिरवी झेंडी मिळाली की नाही, हे गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे येथे आता अ‍ॅड.शिवाजी जाधव यांच्या सेना प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र ते भाजपचेच उमेदवार असतील, अशा वल्गनांमुळे सैनिकही सावधच आहेत. युती तुटली तरच हे शक्य आहे.राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर व राजू नवघरे यांच्यापैकी एक आता यादी जाहीर झाल्यावरच समोर येणार असल्याचे दिसते. तोपर्यंत ही मंडळीही आॅक्सिजनवरच राहणार आहे. तूर्त जिल्ह्यात सगळेच या एकाच दबावाच्या मानसिकतेतून जात असून एकमेकांवर लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliticsराजकारण