शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गावकारभाऱ्यांच्या भाग्याचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:27 IST

कळमनुरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ८०.१७ टक्के मतदान झाले. येथील तहसील कार्यालयात १८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २५ टेबलवर ...

कळमनुरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ८०.१७ टक्के मतदान झाले. येथील तहसील कार्यालयात १८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २५ टेबलवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पर्यवेक्षक, सहाय्यक पर्यवेक्षक यांच्‍या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तहसील कार्यालयात गर्दी होऊ नये अथवा हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी तहसील गेटच्या समोर बॅरिकेट्स लावण्यात आलेले आहेत. प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केलेली आहे. १७ जानेवारी रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उमेदवार व त्यांचे समर्थक मतमोजणीसाठी लागणारे ओळखपत्र घेण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी करीत होते. २५ टेबलद्वारे ११ फेऱ्यांतून मतमोजणी होणार आहे. तहसील कार्यालयात मतमोजणी होणार असल्याने हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. १०० मीटरच्या जवळपास पोलीस कर्मचारी मतमोजणीच्या बंदोबस्तात राहणार आहेत. उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधीला आत प्रवेशाची मुभा राहणार आहे.

तालुक्यात २७५ मतदान केंद्रे असून पहिल्या फेरीत २५ मतदान केंद्रांची व त्यानंतर उर्वरित मतदान केंद्रांवरील मतदानाची मतमोजणी होणार आहे. १३६० उमेदवारांचे भविष्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद आहे. त्यांचा आज निर्णय हाेणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती तहसीलदार दत्तू शेवाळे, नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांनी दिली.