शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खताच्या दरवाढीने शेतकरी शेण खताच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:30 IST

हिंगोली : रासायनिक खताच्या वाढत्या किमतीने शेतकरी कोंडीत सापडला आहे. त्यामुळे शेणखताचा पर्याय निवडला असून शेतकरी शेणखताच्या शोधात असल्याचे ...

हिंगोली : रासायनिक खताच्या वाढत्या किमतीने शेतकरी कोंडीत सापडला आहे. त्यामुळे शेणखताचा पर्याय निवडला असून शेतकरी शेणखताच्या शोधात असल्याचे ग्रामीण भागात दिसत आहे.

खरीप हंगाम जवळ आला असून शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. यावर्षी कृषी विभागाने जिल्ह्यात ४ लाख ११ हजार ३२४ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. यासाठी ७३ हजार १०५ मे.टन खत उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या ७ मे पर्यंत ३५ हजार ८६० मे.टन खत उपलब्ध होते. त्यात पुन्हा खताच्या रॅक मागविण्यात आल्या आहेत. एकीकडे कृषी विभाग कामाला लागला असताना दुसरीकडे शेतकऱ्यांना खताची चिंताही लागली आहे. अगोदरच दोन वर्षापासून शेतीचे उत्पन्न घटले असताना रासायनिक खताच्या वाढत्या किमतीने संकट उभे केले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकरी शेण खताकडे वळले आहेत. पशुपालकांचा शोध घेवून त्यांच्याकडून शेणखत खरेदी केले जात आहे. काही शेतकऱ्यांनी तर रासायनिक खतच वापरणार नसल्याची भूमिका घेतली आहे. सध्या शेणखताची एक ट्रॉली २ ते ३ हजार रूपयांना विक्री केली जात आहे. रासायनिक खताच्या तुलनेत शेणखताची किमत कमी असताना जमिन सुपीक राहण्यास मदत मिळणार आहे.

जुने खत अगोदर विक्री करा

जिल्ह्यात जुने ३५ हजार ८६० मे टन खत उपलब्ध आहे. हे खत जुन्याच किमतीत विक्री करणे बंधनकारक आहे. काही व्यापारी जुने खत नवीन दराने विक्री करीत असल्याच्या तोंडी तक्रारी शेतकरी करीत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अगोदर जुने खत विक्री करावे. तसेच ते जुन्याच एमआरपी प्रमाणे विक्री करावे, अशा सूचना कृषी विभागाने कृषी निविष्ठा व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. जुने खत एमआरपी पेक्षा जादा दराने विक्री केल्याचे आढळल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे अवाहन कृषी विभागाने केले आहे.

असे आहेत विविध कंपनीचे रासायनिक खताचे दर (कृषी विभागाच्या माहितीनुसार)

प्रकार जुने दर नवीन दर

डीएपी १२००-१३२५ १५००-१९००

एनपीके १२.३२.१६ ११८५-१२३५ १६००-१८००

एनपीके १०.२६.२६ ११७५-१३३० १५५०-१७७५

२०.२०.०.१३ ९५०-१३०५ ११५०-१६००

एनपीके १९.१९.१९ १२८५ १७००

२४.२४.० १२८०-१३५० १५५०

एनपीके १६. १६.१६ -१०७५-११०० ११२५-१४००

एमओपी ८७५ १०००

१४.३५.१४ १२७५ १७२५

२४.२४.०.८ १३१० १७५०

१५.१५.१५.०९ १०४० १४००

१५.१५.१५ १०६० -- --

एसएसपी(जी) ३९०-४३५ -- --

एसएसपी (पी) ३६०-४०५ -- --

खत विक्रेत्यांनी अगोदर जुने रासायनिक खत विक्री करावे. त्यानंतच नवीन खता विक्रीला प्राधान्य द्यावे. तसेच जुने खत नवीन किमतीत विक्री केल्याची शेतकऱ्यांची तक्रार आल्यास दोषी विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल.

- निलेश कानवडे, कृषी विकास अधिकारी, जि.प. हिंगोली.

रासायनिक खताची भाववाढ अन्यायकारकच आहे. शेतकऱ्यांच्या मनात गैरसमज निर्माण होत आहेत. कंपन्याकडून रोखखत एवढा पैसा व्यापाऱ्यांकडेही नाही. त्यामुळे व्यापारीही खत उचलण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे शासनाने खत दर वाढीचा फेरविचार करावा.

-आनंद निलावार, जिल्हाध्यक्ष, फर्टीलायझर असो.

रासायनिक खत महागल्याने शेतकरी शेण खत खरेदी करण्याकडे वळले आहेत. यामुळे पैशांची बचततही होईल व शेती सुपिक होण्यास मदत होईल.

-डी.एम. माखणे,